Jasmin Walia: कोण आहे जास्मिन वालिया? हार्दिक पांड्या तिला डेट करत असल्याची रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:50 PM2024-08-14T13:50:07+5:302024-08-14T14:00:10+5:30

हार्दिक आणि जास्मीनचे एकाच ठिकाणी व्हॅकेशनचे फोटो व्हायरल

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅन्कोव्हिकचा घटस्फोट खूप चर्चेत राहिला. लग्नानंतर तीन वर्षांनी ते वेगळे झालेत. यानंतर हार्दिक अनन्या पांडेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या. पण आता वेगळंच चित्र दिसत आहे.

घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या जास्मिन वालियाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघंही एकाच ठिकाणी व्हॅकेशनवर असल्याचा संशय नेटकऱ्यांना आला आहे. ही जास्मिन वालिया नक्की आहे तरी कोण?

जास्मीन वालिया ब्रिटीश गायिका आणि टेलिव्हिजन पर्सनॅलिटी आहे. ती म्यूझिक इंडस्ट्री आणि सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इंग्लंडमधील एसेक्स येथे तिचा जन्म झाला. तिचे आईवडील मूळ भारतीय आहेत.

ब्रिटीश टीव्ही सीरिज 'द ओनली वे इज एसेक्स' मधून तिला लोकप्रियता मिळाली. २०१० मध्ये ती या शोमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत आली होती. पण २०१२ पर्यंत ती शोमध्ये मुख्य अभिनेत्री बनली.

२०१४ मध्ये जास्मिनने युट्यूब चॅनल सुरु केलं. यामध्ये तिने जॅक नाइट, इंटेंस टी आणि ओली ग्रीन यांच्यासोबत आपलं सिंगिंग टॅलेंट दाखवलं. 2017 मध्ये आलेल्या 'बॉम डिग्गी' गाण्यामुळे तिला म्युझिक इंडस्ट्रीत यश मिळालं. हे गाणं नंतर २०१८ मध्ये 'सोनू के टिटू की स्वीटी' या हिंदी सिनेमात रिमेक म्हणून वारण्यात आलं.

2022 मध्ये जास्मिनने बिग बॉस फेम असीम रियाजसोब 'नाइट्स एन फाइट्स' या म्युझिक व्हिडिओत काम केलं. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाला.

जास्मिनचे इन्स्टाग्रामवर ६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर 5.7 लाख सबस्क्रायबर्स आहेत. ती सोशल मीडिया स्टारही आहे. इन्स्टाग्रामवर तिचे बिकीनी फोटोही व्हायरल झालेत.

जॅस्मीनने नुकतेच ग्रीसमधील व्हॅकेशनचे फोटो शेअर केलेत. हार्दिक पांड्यानेही त्याच्या व्हॅकेशनचे फोटो पोस्ट केलेत. दोघांच्या फोटोत बॅकग्राऊंड सारखंच आहे. त्यामुळे ते एकत्रच व्हॅकेशनला गेले असून त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसंच हार्दिक खूप लवकर मूव्ह ऑन झाला म्हणत त्याला ट्रोलही करण्यात येत आहे.