"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 01:40 PM2024-12-04T13:40:40+5:302024-12-04T13:51:09+5:30

ब्रेकअपनंतर मनात खूप भीती निर्माण झाली होती असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

अभिनेत्री जिया शंकर हिने अनेकदा आपल्या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणाने संवाद साधला आहे. ती कोणत्या प्रसंगातून गेली आहे हे सांगितलं आहे.

जियाने सांगितलं होतं की, ती एका अशा रिलेशनशिपमध्ये होती जिथे तिला खूप त्रास सहन करावा लागला होता.

ब्रेकअपनंतर तिच्या मनात खूप भीती निर्माण झाली होती असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

"ब्रेकअपनंतर आता मी कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. माझा विश्वास पूर्णपणे तुटला आहे."

"लोकांनी माझा खूप फायदा घेतला आहे. त्यामुळे आता कोणावरही विश्वास ठेवणं खूप कठीण आहे."

"खूप जास्त विचार करून मी एखाद्यावर विश्वास ठेवेन. मला आयुष्यात कोणतंही रिग्रेट ठेवायचं नाही."

"मी टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे मी पूर्णपणे खचून गेली. याच दरम्यान मी स्वत:ला हरवून बसली होती" असं जियाने म्हटलं आहे.

अभिनेत्रीने आता आपल्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. ती ३० वर्षांची झाली असून आता तिला लवकरात लवकर लग्न करायचं आहे.

"मला लवकर लग्न करायचं आहे. तीन मुलांना जन्म द्यायचा आहे. जर दोन वर्षांत मुलगा मिळाला नाही तर मी अरेंज मॅरेज करेन" असं जियाने म्हटलं.

जिया शंकरने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे असंख्य चाहते आहेत. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.