kal ho na ho fame jia aka jhanak shukla who shared screen with shah rukh khan know about her
कुठे गायब झाली 'कल हो ना हो'मधली चिमुकली? इंडस्ट्री सोडून आता काय करते माहितीये? By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 03:47 PM2024-12-02T15:47:53+5:302024-12-02T15:51:42+5:30Join usJoin usNext आता जियाला ओळखणंही कठीण जाईल इतका तिच्यात बदल झाला आहे. २००३ साली प्रदर्शित झालेला 'कल हो ना हो' हा एव्हरग्रीन सिनेमा आहे. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. शाहरुख खानच्या या सिनेमात झनक शुक्ला हिनी चिमुकल्या जियाची भूमिका साकारली होती. सिनेमातील ही चिमुरडी प्रेक्षकांना आवडली होती. झनकला 'करिश्मा का करिश्मा', 'सोनपरी' या टीव्ही मालिकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल. याशिवाय काही जाहिरातींमध्येही तिने काम केलं आहे. २०१२ साली प्रसारित होणाऱ्या 'गुमराह' या मालिकेत ती शेवटची दिसली होती. त्यानंतर मात्र झनकने सिनेइंडस्ट्रीला रामराम केला. झनक ही अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांची मुलगी आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवत ती सिनेसृष्टीकडे वळली होती. पण, नंतर मात्र वेगळं विश्व खुनावल्याने सिनेविश्वापासून ती दूर झाली. झनकला इतिहासात रुची असून सध्या ती त्याचच शिक्षण घेत आहे. सिनेविश्वापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. पण, गेल्या २१ वर्षांत मात्र तिच्यात खूप बदल झाला आहे. आता झनकला ओळखणंही कठीण जाईल इतका तिच्यात बदल झाला आहे. टॅग्स :शाहरुख खानटिव्ही कलाकारसेलिब्रिटीShahrukh KhanTV CelebritiesCelebrity