'फॅशन' का है ये, जलवा... 'पंगा क्वीन' कंगना राणौतचं नवं फोटोशूट पाहाचं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:54 IST2025-01-06T16:48:27+5:302025-01-06T16:54:10+5:30

'पंगा क्वीन' कंगना राणौत सध्या 'इमर्जन्सी' (Emergency) सिनेमामुळे चर्चेत आहे.
हा सिनेमा १७ जानेवारी २०२५ ला जगभरात प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे कंगना रणौतनेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
अशातच आता कंगनाने सोशल मीडियावर नवं फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यात ती अगदी सुंदर दिसतेय.
या फोटोशूटसाठी कंगनाने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
मोकळे केस आणि न्यूड मेकअप असा लूक तिनं पुर्ण केला आहे. तर एकापेक्षा एक पोज देत तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे
खासदार बनल्यानंतर कंगनाच्या फॅशनचा जलवा या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय.
बॉडीकॉन ड्रेसमध्ये कंगनाचं कर्व्ही फिगर हायलाईट होत आहे. चाहत्यांच्या नजरा देखील तिच्या फोटोंवर थांबल्या आहेत.
हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून तिच्या या फोटोंवर लाईक्स कमेंटचा पाऊस पडला आहे.