कंगना राणौतचं रेस्टॉरंट 'द माउंटन स्टोरी' आहे तरी कसं; पाहा INSIDE PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:16 IST2025-02-14T16:09:10+5:302025-02-14T16:16:30+5:30
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतनं हिमाचल प्रदेश येथे नवीन रेस्टॉरंट सुरु केलंय.

अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिनं अभिनय आणि राजकारणानंतर आता हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.
आज 'व्हॅलेंटाईन डे'ला कंगनाच्या नव्या रेस्टॉरंटची ओपिनंग झाली आहे.
हिमालयाच्या कुशीत मनालीच्या प्रिनी येथे कंगनाचं हे नवं रेस्टॉरंट आहे. प्रिनी हे मनालीपासून सुमारे ४ किमी अंतरावर आहे. 'द माउंटन स्टोरी' असं तिच्या या रेस्टॉरंट नाव (Kangana Ranaut’s Restaurant The Mountain Story In Manali) आहे.
कंगनाच्या रेस्टॉरंटमध्ये देश-विदेशातील विविध पदार्थांव्यतिरिक्त हिमाचली पदार्थ असणार आहेत. यात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण मिळणार आहे.
'द माउंटन स्टोरी'मध्ये शाकाहारी थाळीची किंमत ७८० रुपये आहे तर मांसाहारी थाळीची किंमत ८५० रुपये आहे.
याशिवाय, सिड्डूचा समावेश प्रामुख्याने नाश्त्यात केला आहे. खवय्यांसाठीही इथे पर्वणी आहे.
कंगनाच्या रेस्टॉरंटमधल अनेक गोष्टी या पारंपरिक आहेत. येथे डेकोरेशनसाठी जुन्या पारंपरिक भांड्यांचा वापर केलाय.
कंगनाच्या रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचा पेहराव सुद्धा पहाडी भागातील लोकांप्रमाणे आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी कंगनाने रेस्टॉरंटमध्ये पूजा आयोजित केली होती. अतिशय सकारात्मक Vibes तुम्हाला या रेस्टॉरंटमध्ये आल्यावर मिळणार आहेत.
बर्फाच्छित प्रदेश आणि सुंदर डिझायन केलेलं 'द माउंटन स्टोरी' कॅफे सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.