रागाच्या भरात सेटवर करीनाने या अभिनेत्रीच्या लगावली होती कानशीलात, वाचा नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:29 IST2025-04-16T17:23:03+5:302025-04-16T17:29:25+5:30
Kareena Kapoor : अभिनेत्री करीना कपूरचा हा किस्सा वाचून व्हाल हैराण

बॉलिवूडमधले बऱ्याच कलाकारांमधील मतभेदाचे किस्से ऐकले असतील. अभिनेत्रींमध्ये तर सऱ्हास कॅट फाइट होत असे. आज असाच एक सेटवरचा किस्सा सांगणार आहोत, ज्यात वाद इतका वाढला की अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्रीच्या कानशीलात लगावली.
खरंतर आम्ही करीना कपूर खान आणि बिपाशा बासू बद्दल बोलत आहोत, ज्या इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहेत. दोघेही पहिल्यांदा 'अजनबी' चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या. पण दोघांचे फारसे काही पटले नाही. उलट त्यांचा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
हे प्रकरण इतके वाढले की करीना कपूरने बिपाशाला थप्पड मारली. एवढेच नाही तर करीनाने बिपाशाला अनेक वाईट शब्दही बोलली आणि ही संपूर्ण घटना चित्रपटाच्या सेटवर घडली.
बिपाशाने २००१ मध्ये 'अजनबी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या दोन अभिनेत्रींव्यतिरिक्त अक्षय कुमार आणि बॉबी देओल देखील या चित्रपटात काम करत होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या सेटवरच दोघांमध्ये कपड्यांवरून वाद सुरू झाला. हे प्रकरण इतके वाढले की करीनाने बिपाशाच्या कानशीलात लगावली. करीनाने बिपाशाच्या रंगावरूनही कमेंट केली आणि तिला काळी मांजर म्हणाली.
नंतर, एका मुलाखतीत बोलताना, बिपाशा बसूने या घटनेचा उल्लेख केला. बिपाशाने करीनाच्या या वागण्याला बालिश म्हटले होते. यानंतरही या दोघींनी एकत्र काम केले.
हा चित्रपट अजय देवगण स्टारर 'ओमकारा' होता, ज्यामध्ये करीना मुख्य भूमिकेत होती आणि बिपाशा एका डान्स नंबरमध्ये दिसली होती. त्या दोघांमध्ये एकत्र फारसे सीन नव्हते.
बिपाशा अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. करीना शेवटची 'सिंघम अगेन' मध्ये दिसली होती. सध्या ती पृथ्वीराज सुकुमारनसोबतच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.