फोटोत दिसणाऱ्या या सुंदर चिमुकल्या कोण? आता दिसतात इतक्या हॉट की ओळखूही येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 10:42 AM2024-09-22T10:42:19+5:302024-09-22T10:46:33+5:30

फोटोतील या चिमुकलींना ओळखलं का? दोन्ही बहिणी आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, एकेकाळी बॉलिवूडवर करायच्या राज

अनेक सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसायचे, याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते.

सध्या बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींचा बालपणीचा असाच एक फोटो समोर आला आहे. या फोटोत दिसणाऱ्या दोन अभिनेत्री या बहिणी असून बॉलिवूड गाजवत आहेत.

या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून कपूर सिस्टर्स आहेत. बॉलिवूडची बेबो करीना कपूरचा वाढदिवस नुकताच झाला. करीनाच्या वाढदिवशी लोलो म्हणजेच करिश्मा कपूरने बालपणीचे काही फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या.

करिश्माने करीनाच्या बालपणीच्या वाढदिवस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये रणधीर कपूर आणि बबिता कपूरही दिसत आहेत.

करीनाने तिचा ४४ वाढदिवस सेलिब्रेट केला. तिच्या वाढदिवशी हे फोटो शेअर करत करिश्माने खास पोस्टही लिहिली होती.

"४ वर्षांपासून ते ४४ वर्षांपर्यंत...कायम एकत्र...तुझा वाढदिवस नेहमी सेलिब्रेट करणार...हॅपी बर्थडे टू बेस्ट सिस्टर", असं कॅप्शन तिने फोटोला दिलं होतं.

करिश्मा आणि करीना यांनी बॉलिवूडमध्ये ९०चं दशक गाजवलं. त्या दोघींनीही अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.

कपूर सिस्टर्स बॉलिवूडमधील करिअरबरोबरच त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असायच्या.