करीना कपूर नाहीये बेबोचं खरं नाव; बऱ्याच वर्षांनी समोर आलं अभिनेत्रीचं रिअल नेम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 10:49 AM2023-10-18T10:49:39+5:302023-10-18T10:58:06+5:30

Kareena kapoor: करीनाचं नाव तिच्या आजोबांनी ठेवलं होतं. मात्र, हे नाव बदलून तिने करीना हे नाव लावण्यास सुरुवात केली.

बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाचा चांगलाच दबदबा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे घराणं इंडस्ट्रीवर एक प्रकारे राज्य करत आहे.

कपूर कुटुंबातील जवळपास ४ पिढ्या बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. त्यामुळे या कुटुंबाविषयी अनेक गोष्टी चाहत्यांना ठावूक आहे.

पृथ्वीराज कपूरपासून ते रणबीर कपूरपर्यंत अनेक सुपरस्टार या घराने इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी कायम जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

कपूर कुटुंबातील करीना कपूर आणि करिश्मा कपूर या बहिणींची जोडी कलाविश्वासह सोशल मीडियावरही हिट आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी अनेक गोष्टींची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते.

करीना आणि करिश्माने त्यांच्या अभिनयकौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

सध्या नेटकऱ्यांमध्ये करीनाची चर्चा रंगली आहे. सैफ अली खान सोबत लग्न करणारी करीना कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते.

करीना तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

करीना या नावाने प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीला बेबो असंही म्हटलं जातं. मात्र, तिचं खरं नाव काही वेगळंच आहे.

करीना कपूरचं खऱं नाव दुसरंच असून फार कमी जणांना तिचं खरं नाव माहित आहे.

करीनाचं खरं नाव सिद्धिमा कपूर असं आहे. करीनाचे आजोबा राज कपूर यांनी तिचं नाव सिद्धिमा असं ठेवलं होतं.