kgf 2 star yash wife radhika pandit beats bollywood actresses in beauty see photos
KGF 2: जाणून घ्या कोण आहे रॉकी भाईची पत्नी, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देते टक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 01:30 PM2022-04-19T13:30:07+5:302022-04-19T14:16:29+5:30Join usJoin usNext सुपरस्टार यशची पत्नी राधिका पंडित ही दोन मुलांची आई आहे. ती स्वतः देखील एक अभिनेत्री आहे आणि सध्या ती कामासोबतच आपल्या कुटुंबाचीही काळजी घेते. (Photo Instagram) राधिका पंडित सौंदर्यांच्याबाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते. ती अनेकदा तिचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.(Photo Instagram) राधिकाला शिक्षिका व्हायचे होते, पण ती जेव्हा बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला होती तेव्हाच तिने अभिनय विश्वात प्रवेश केला. राधिकाच्या मैत्रिणीने तिला कन्नड टीव्ही शोमध्ये ऑडिशन देण्यासाठी संपर्क साधला होता. (Photo Instagram) या टीव्ही सीरियलचे नाव 'नंदा गोकुळा' होते, ज्यामध्ये राधिकाला ऑडिशन न देता काम मिळाले. यानंतर राधिका सुमंगली नावाच्या दुसऱ्या टीव्ही मालिकेत दिसली.(Photo Instagram) यानंतरच राधिकाचा चित्रपट प्रवास सुरू झाला. दिग्दर्शक शशांकने राधिकाला त्याच्या 18th Cross आणि Mogginna Manasu या चित्रपटांमध्ये कास्ट केले होते. (Photo Instagram) राधिकासाठी तिची पहिली मालिका 'नंदा गोकुळा' खूप खास आहे कारण तिने या मालिकेतून पदार्पण केले होते आणि या मालिकेच्या सेटवर ती पहिल्यांदाच यशला भेटली होती. (Photo Instagram) या मालिकेत यश राधिकाच्या सोबत दिसला होता. यानंतर दोघांनी मोग्गीन्ना मनसु या चित्रपटातही एकत्र काम केले.(Photo Instagram) एकत्र काम करत असताना राधिका आणि यश यांची मैत्री झाली आणि नंतर हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. (Photo Instagram) राधिका आणि यश यांनी त्यांचे नाते सीक्रेट ठेवले आणि त्यांनी अगदी खाजगी पद्धतीने लग्नही केले. (Photo Instagram) सोशल मीडियावर राधिकाची फॅन फॉलोइंग पती यशपेक्षा कमी नाही. तिच्या प्रत्येक फोटोला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात.(Photo Instagram) राधिका आणि यश यांना दोन मुलं आहेत. अनेकदा त्यांच्या मुलांसोबत फोटो शेअर करत असतात. (Photo Instagram) टॅग्स :केजीएफTollywoodkgf 2Tollywood