khushali Kumar sizzling hot photos in trend who is she here is all info
'खुशाल' पाहा 'खुशाली'चे PHOTOS, जिच्या 'हॉटनेस'ची बॉलीवूडमध्येही जोरदार चर्चा! आहे तरी कोण?... By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 01:50 PM2022-12-25T13:50:28+5:302022-12-25T14:23:55+5:30Join usJoin usNext सोशल मीडियात सध्या अभिनेत्री खुशाली कुमारच्या हॉट फोटोंची जोरदार चर्चा आहे. या नवख्या अभिनेत्रीनं आपला पहिल्याच सिनेमातून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. खुशाली कुमारचा नेटफिल्सवर नुकताच 'धोखा - राऊंड डी कॉर्नर' सिनेमा प्रदर्शित झाला. तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आणि तिच्या हॉटनेसची खूप चर्चा झाली. खुशाली 2015 मध्ये 'मैनु इश्क दा' या व्हिडीओ साँगमध्ये दिसली होती, यानंतर ती हायवे स्टार, रात कमल है, मेरे पापा, इक याद पुरानी या लोकप्रिय गाण्यांमध्ये दिसली.(Photo Instagram)कोण आहे खुशाली कुमार? खुशाली कुमार टी-सीरीज ग्रुपचे संस्थापक गुलशन कुमार यांची मुलगी आहे आणि भूषण कुमारची बहीण आहे. खुशाली कुमार अभिनेत्री तर आहेच पण ती एक उत्तम फॅशन डिझायनर देखील आहे. तिनं फॅशन डिझाइनिंगमध्ये शिक्षण घेतलं आहे. सध्या खुशालीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. तिच्या हटके फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. खुशालीला 'धोका- राऊंड द कॉर्नर' या सिनेमासाठी सत्यजित रे आयकन सिनेमा पुरस्कार (उत्कृष्ट नवोदित कलाकार) पुरस्कार देखील मिळाला आहे. मूळातच स्वत: फॅशन डिझायनर असल्यानं खुशालीचा फॅशन सेन्स उत्तम आहे आणि त्याबाबत चाहतेही सोशल मीडियात तिचं कौतुक करत असतात. सोशल मीडियात इन्स्टाग्रामवर तिचे ३ मिलियनहन अधिक फॉलोअर्स आहेत. टी-सीरिजच्या गुलशन कुमार यांची मुलगी असल्यानं खुशालीनं सिनेमात पदार्पण करण्याआधी अनेक म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे. 'मेनू इश्क दा लगया रोग' गाण्यातून खुशालीनं आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ केलं होतं. 'हायवे स्टार', 'रात कमाल है', 'मेरे पापा' , 'इक याद पुरानी' सारख्या लोकप्रिय गाण्यांमध्येही ती दिसली आहे. २०१८ मध्ये खुशालीनं काही शॉर्टफिल्ममध्येही काम केलं आहे. त्यापैकी 'जीना मुश्कील है यार' या शॉर्टफिल्मचा प्रीमियर यूके येथील 'फिल्म फेस्टिव्हल ऑफ लाइफ'मध्ये झाला होता. खुशालीने तिचे दिवंगत वडील गुलशन कुमार यांना श्रद्धांजली म्हणून बहिण तुलसी कुमारने गायलेल्या गाण्यातही काम केलं होतं. खुशाली तिच्या हटके फॅशन डिझाइन्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेत आली आहे. त्यामुळे तिच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा बॉलीवूडकरांमध्येही असते. टॅग्स :गुलशन कुमार बॉलिवूडGulshan Kumarbollywood