बाबो! सेटवरून नको नको ते उचलून आणतात अभिनेत्री, कुणी आणली उशी तर कुणी गाउन.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 05:35 PM 2021-12-31T17:35:18+5:30 2021-12-31T17:40:39+5:30
Kiara Advani To Sanya Malhotra : सान्या मल्होत्राला ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या चित्रपटात तिने नेसलेल्या साड्या इतक्या आवडल्या की, तिने त्या चोरून घरी नेल्या... अर्थात असं करणारी सान्या एकटी नाही. बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राचा मीनाक्षी सुंदरेश्वर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सान्याने कॉटन आणि सिल्कच्या साड्या परिधान केल्या होत्या. सान्याला या साड्या प्रचंड आवडल्या होत्या. मग काय, जेव्हा शूट संपलं तेव्हा तिने काही साड्या चोरल्या होत्या. याचा खुलासा नुकताच सान्याने एका मुलाखतीत केला आहे.
कियारा अडवाणीने ‘फगली’ या सिनेमातून डेब्यू केला होता. या चित्रपटातील बूट्स तिला इतके आवडले की, ती ते घरी घेऊन आली आणि मग ते माझेच आहेत, असं म्हणून तिने ते आजही सांभाळून ठेवले आहेत. अर्थात पहिल्या सिनेमाची आठवण म्हणून.
सोनाक्षी सिन्हा प्रत्येक चित्रपटाच्या सेटवरून काही ना काही घरी घेऊन जाते. सुरूवातीला प्रत्येक सिनेमातील काही आऊटफिट ती घरी घेऊन जायची आणि वापरायची.
‘दम लगा के हइशा’ या सिनेमात भूमी पेडणेकरने गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता. तो तिला इतका आवडला होता की, ती तो घरी घेऊन गेली होती.
तमन्ना भाटिया ही सुद्धा बाहुबली सिनेमाच्या सेटवरची एक वस्तू उचलून घरी घेऊन गेली होती. होय, या चित्रपटात घातलेलं एक लॉकेट तिला इतकं आवडलं होतं की, तिने ते परत न करता स्वत:जवळ ठेवलं.
नुसरत भारूचा हिने तर कमालचं केली. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातील एक लाल रंगाची उशी तिला जाम आवडली. मग काय, ही हार्ट शेप उशी ती घरी घेऊन गेली. आजही ती तिच्या घरी आहे.