RRR: अबब! तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं बजेट ऐकून डोळे चक्रावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 04:42 PM2022-03-21T16:42:38+5:302022-03-21T16:48:32+5:30

दक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली त्यांच्या मेगा बजेट सिनेमांसाठी ओळखले जातात. सध्या त्यांचा सिनेमा RRR सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत. त्यामुळे RRR ची पूर्ण टीम सिनेमाच्या प्रमोशन आणि रिलीजच्या तयारीत व्यस्त आहे.

एसएस राजामौली(S.S.Rajamouli) यांच्या बहुचर्चित सिनेमावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत. अशावेळी सिनेमाशी निगडीत काही गोष्टींवर माध्यमांत चर्चा सुरू झाली आहे. या सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे सिनेमाच्या बजेटपासून कलाकारांच्या मानधनापर्यंत सर्वकाही जाणून घेऊया.

RRR या सिनेमात बॉलिवूडमधील अजय देवगण आणि आलिया भट्ट दाक्षिणात्य सिनेमात पर्दापण करत आहेत. त्याचसोबत या सिनेमात साऊथ सुपरस्टार रामचरण आणि ज्युनिअर एनटी रामाराव मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्याशिवाय हॉलिवूडच्या कलाकारांचाही सिनेमात समावेश आहे.

राजामौली यांच्या बिगस्टार कलाकारांच्या या सिनेमाचं बजेटही बिग असणार यात शंका नाही. रिपोर्टनुसार, RRR सर्वात महागड्या सिनेमांच्या यादीतील एक बनला आहे. या सिनेमावर जवळपास ३३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र त्यात स्टारकास्टच्या मानधनाचा समावेश नाही.

या सिनेमाचं कथानक क्रांतिकारी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम यांच्या भोवती फिरतं. ज्यांनी ब्रिटीश काळात आणि हैदराबाद निजामांविरोधात लढाई लढली होती. सिनेमात एनटीआरला कोमाराम भीम आणि अभिनेता रामचरणला अल्लूरी सीतारामची भूमिका दिली आहे.

रिपोर्टनुसार, RRR या सिनेमासाठी ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांना प्रत्येकी ४५ कोटी रुपये मानधन दिले आहे. तर अजय देवगण यांनी कॅमियोच्या भूमिकेसाठी २५ कोटी मानधन घेतले आहे. या सिनेमात आलिया भट्टनं सीता ही भूमिका निभावली आहे. त्यासाठी तिने ९ कोटी मानधन घेतले आहे.

राजामौली यांच्या आरआरआर(RRR) या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहते प्रतिक्षा करत होते. सुरुवातीला कोरोनामुळे या सिनेमाचं प्रदर्शन लांबलं. परंतु आता प्रेक्षकांना जास्त काळ वाट पाहण्याची गरज नाही. कारण येत्या २५ मार्च २०२२ रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

एका मुलाखतीत एस.एस. राजामौली म्हणाले होते की, 'जेव्हा आपल्याकडे इतकं मोठं यूनिट आहे. जर काही चुकीचं झालं तर लाखो रूपये खर्च होतात. आम्ही ६५ रात्रींपर्यंत 'RRR'च्या इंटरव्हलच्या सीक्वेंसचं शूटींग करत होतो. अशात शेकडो कलाकार होते ज्यांना वेगवेगळ्या देशातून बोलवण्यात आलं होतं. प्रत्येक रात्रीच्या शूटींगचा खर्च ७५ लाख रूपये होता'

‘आरआरआर’ या सिनेमाच्या नावाचीही बरीच चर्चा झाली. ‘आरआरआर’ हे नाव ठेवण्यामागच्या कारणांचा खुलासा खुद्द राजमौलींनी केला होता. राम चरण (Ram Charan) , रामा राव (Jr. NTR)आणि राजमौली म्हणून आम्ही आरआरआर हा हॅशटॅग वापरणं सुरू केलं आणि याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहून आम्ही सिनेमाला सुद्धा आरआरआर हे नाव दिलं असं त्यांनी सांगितले होते. ’

‘आरआरआर’ या चित्रपटावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला आहे. या खर्चाचे आकडेही थक्क करणारे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सिनेमाचं शूटींग सुरू होते आणि एका दिवसाचा खर्च किती? तर दरदिवसाला 75 लाख रूपये खर्च होत होते