कॅप्टन कूल धोनीच्या मेहुण्यासोबत लग्नगाठ बांधणार 'ही' अभिनेत्री! पटकावलेला आहे National Film Award

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 01:29 PM2024-08-09T13:29:51+5:302024-08-09T13:52:45+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भारतीय क्रिकेटर धोनीच्या मेहुण्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अभिनेत्यांना सोडून व्यावसायिकांशी केलं. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रींचं नातं एका व्यावसायिकाशी जोडलं जातं आहे. हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही बोललं जात आहे.

ही अभिनेत्री दुसरी- तिसरी कोणी नाही तर क्रिती सनॉन (Kriti Sanon) आहे. क्रिती सनॉन सध्या अफेअर आणि लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने याबाबत कोणतेही वक्तव्य केले नसले तरी त्यांचे नाते सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

क्रितीच्या बॉयफ्रेंडचं नाव कबीर बहिया (Kriti Sanon Boyfriend Kabir Bahia) आहे. दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असून ते लवकरच लग्न करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

क्रिती आणि तिची बहीण नुपूरसोबतदेखील अनेकदा कबीर स्पॉट झाला आहे. त्यांनी नवीन वर्ष एकत्र साजरे केलं होतं. शिवाय, नुकतेच क्रितीने तिचा वाढदिवस ग्रीसमध्ये साजरा केला. यावेळी तो तिच्यासोबत ग्रीसमध्ये असल्याची चर्चा होती.

क्रितीला नेहमीच आपलं आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं. त्यामुळे कदाचित तिने आतापर्यंत कबीरसोबतच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

कबीर हा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीचा मेहुणा (Mahendra Singh Dhoni Brother In Law Kabir Bahia) असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. तो धोनीची पत्नी साक्षीचा मावस भाऊ आहे.

याशिवाय कबीर आणि धोनीही चांगले मित्र आहेत. क्रितीदेखील अनेकदा धोनी आणि साक्षीसोबत दिसून आली आहे.

कबीर बहिया (Kabir Bahia) हा UK स्थित एक बिझनेसमन आहे. तो NRI कुटुंबातील आहे आणि Worldwide Aviation and Tourism Limited कंपनीचा संस्थापक असूनकरोडोंची कमाई करतो. कबीरच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाले तर, 2019 च्या संडे टाइम्स रिच लिस्टनुसार, त्याच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 4600 कोटी रुपये आहे.

'क्रू', 'आदिपुरूष', 'मीमी','गणपत', 'लुका छिपी', 'दिलवाले' अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री क्रिती सनॉन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

क्रितीने याआधी सुशांत सिंह राजपुतला डेट केल्याची चर्चा ( rumoured that Kriti in a relationship with Sushant Singh Rajput) होती. मात्र, दोघांनीही आपलं नात कबूल केलं नव्हतं.