आमिरचं टेन्शन वाढलं, Laal Singh Chaddhaला या राज्यात बॅन करण्यासाठी कोर्टात याचिका By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 01:49 PM 2022-08-23T13:49:44+5:30 2022-08-23T15:10:56+5:30
आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’((Laal Singh Chaddha) या चित्रपटाबाबत सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता चित्रपटावर बंदी घालण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आला आहे. आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’((Laal Singh Chaddha) या चित्रपटाबाबत सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. 'लाल सिंग चड्ढा'बाबत एकामागून एक निराशाजनक बातम्या समोर येत आहेत.
आता कोलकाता उच्च न्यायालयात लाल सिंग चड्ढा यांच्या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
*काय आहे प्रकरण?* लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत आधीच संघर्ष करत आहे आणि आता एका जनहित याचिकेद्वारे बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
याशिवाय चित्रपटावर बंदी घातली नाही तर प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर पोलीस तैनात करावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
या चित्रपटात जे दाखवले आहे त्यामुळे बंगालमधील शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणावर आज (मंगळवारी) सरन्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वकील नाझिया इलाही खान यांनी 'लाल सिंह चड्ढा'बाबत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मते, बंगालमधील वातावरण सध्या धार्मिक मुद्द्यांसाठी खूपच अस्थिर आहे . ज्यामुळे चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बंगालमध्ये लालसिंग चड्ढा यांच्यावर बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
चित्रपटात लष्कराची भूमिका नीट मांडण्यात आलेले नाही, त्यामुळे त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बंगालमध्ये लालसिंग चड्ढा यांच्यावर बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.