सिनेमासाठी या ब्युटी'फूल' अभिनेत्रीने सोडलेली ११ वीची परीक्षा, आज बॉलिवूडमध्ये कमावलं नाव! ओळखलंत का कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 11:26 AM2024-09-25T11:26:43+5:302024-09-25T11:50:40+5:30

एका बॉलिवूड अभिनेत्रीने सिनेमासाठी ११ वीची परीक्षा सोडून नाव कमावलंय. सध्या या अभिनेत्रीची चांगलीच चर्चा आहे

सध्या 'लापता लेडीज' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाने ऑस्कर २०२५ साठी भारतातर्फे प्रवेश मिळवला आहे. या सिनेमातील एका अभिनेत्रीने 'लापता लेडीज'साठी ११ वीची परीक्षा सोडली होती

ही अभिनेत्री म्हणजे सिनेमात फूलची भूमिका साकारणारी नितांशी गोयल. नितांशीने एका पॉडकास्टमध्ये या घटनेचा उल्लेख केला

नितांशीने किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'मध्ये साकारलेली फूलची भूमिका प्रेक्षकांना आवडली. नितांशीने या भूमिकेसाठी तिची ११ वीची परीक्षा अर्ध्यावर सोडली होती

झालं असं की.. 'लापता लेडीज'चं शूटींग सुरु झालं तेव्हा नितांशी ९ वीला होती. पुढे सिनेमाच्या प्रमोशनची वेळ आली तेव्हा नितांशी ११ वीची परीक्षा देत होती

सिनेमाच्या प्रमोशनसाठी नितांशीने ११ वीची परीक्षा अर्ध्यावर सोडली. पुढे प्रमोशन वगैरे झाल्यावर नंतर शिक्षकांच्या परवानगीने नितांशीने परीक्षा दिली

नितांशीने 'लापता लेडीज'सारख्या सिनेमात काम केल्याने तिच्या शाळेला आणि शिक्षकांना तिचा अभिमान आहे. आज या सिनेमाने ऑस्करमध्ये प्रवेश मिळवल्याने

'लापता लेडीज' आधी नितांशीने एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी, इंदू सरकार अशा सिनेमांमध्ये अभिनय केला. वयाच्या ९ व्या वर्षापासून नितांशी अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे