करिअरच्या सुरुवातीलाच सुपरहिट सिनमा देऊनही बॉलिवूडपासून दूर झाली अभिनेत्री ग्रेसी सिंग By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 10:40 AM 2021-06-23T10:40:25+5:30 2021-06-23T10:49:57+5:30
आशुतोष गोवारीकर यांच्या 'लगान' या सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती.त्यामुळंच भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. लगानमुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं. अजय देवगणसह 'गंगाजल' आणि संजय दत्तसह 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात ग्रेसीने काम केलं हे दोन्ही सिनेमा सुपरहिट ठरले होते.
सोबतच ग्रेसीने साकारलेल्या भूमिकाही तितक्याच हिट आणि लक्षवेधी ठरल्या.
याशिवाय तिने अनिल कपूर आणि प्रिती झिंटा स्टारर 'अरमान' या सिनेमात काम केलं होतं.
मात्र या निवडक सिनेमांनंतर ग्रेसीच्या सिने करिअरची गाडी रुळावरुन घसरली.
सिनेमाच्या ऑफर्सही येत होत्या, पण बोल्ड आणि इंटिमेट सीन्स करायला तिने नकार दिला होता.
२००७ मध्ये ग्रेसी तिच्या एक चूक केली आणि तीच चूक तिचे करिअर संपवण्यास कारणीभूतही ठरली.
सिनेमाची स्क्रिप्ट न वाचताच तिने 'देशद्रोही' सिनेमा करण्यास होकार दिला.
'देशद्रोही' सिनेमानंतर ग्रेसी कोणत्याच सिनेमात झळकली नाही.
करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला.
ग्रेसीसाठी छोट्या पडद्यावर काम करणं ही बाब काही नवी नव्हती.
१९९७ साली अमानत मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली होती.
या मालिकेत काम करत असतानाच तिने लगान सिनेमासाठी स्क्रीन टेस्ट दिली आणि तिची लगानसाठी निवड झाली. यानंतर ग्रेसी सिनेमांमध्ये रमली.