IN PICS : विजय देवरकोंडाने 11 वर्षात फक्त 4 ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत, ‘फ्लॉप’चा आकडा वाचून धक्का बसेल!! By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 04:40 PM 2022-08-28T16:40:22+5:30 2022-08-28T16:52:16+5:30
Vijay Deverakonda : विजयचा ‘लाइगर’ हा सिनेमा फ्लॉपच्या रांगेत बसला आहे. तीनच दिवसांत हा चित्रपट सपशेल आपटला. अर्थात हा काही विजय देवरकोंडाचा पहिला फ्लॉप नाही... साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या ‘लाइगर’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूड डेब्यू केला. अर्थात त्याचा हा डेब्यू फसला.
‘लाइगर’ हा विजयचा सिनेमा फ्लॉपच्या रांगेत बसला आहे. तीनच दिवसांत हा चित्रपट सपशेल आपटला आहे. अर्थात हा काही विजय देवरकोंडाचा पहिला फ्लॉप सिनेमा नाही.
‘लाइगर’ हा विजयच्या 11 वर्षांच्या करिअरमधील 17 वा सिनेमा आहे. त्याआधी 11 वर्षांच्या करिअरमध्ये त्याने 16 सिनेमे केलेत. पैकी फक्त 4 सिनेमे ब्लॉकबस्टर ठरलेत.
2011 मध्ये विजयने ‘नुव्वीला’ या चित्रपटातून करिअरची सुरूवात केली होती. त्याच्या या पहिल्या सिनेमाने ठीक ठिक कमाई केली होती.
पुढच्याच वर्षी ‘लाइफ इज ब्यूटिफुल’ हा त्याचा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नव्हता.
2016 मध्ये विजय देवरकोंडा ‘येवडे सुब्रमण्यम’ या चित्रपटात झळकला. त्याच्या या सिनेमाला पहिल्या दोनपेक्षा चांगलं यश मिळालं. हा सिनेमा हिट झाला.
2016 साली विजयने ‘पेली चोपुलु’ या चित्रपटातून पहिल्यांदा लीड रोलमध्ये डेब्यू केला. हा चित्रपट मात्र ब्लॉकबस्टर ठरला. 1 कोटी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं सुमारे 30 कोटी कमावले होते.
2017 साली विजयचे दोन सिनेमे रिलीज झालेत. यापैकी एक द्वारका नावाचा सिनेमा सुपरडुपर फ्लॉप ठरला आणि दुसरा ‘अर्जुन रेड्डी’ सुपरडुपर हिट.
‘अर्जुन रेड्डी’ या सिनेमाने विजय देवरकोंडाला खरी ओळख दिली. 5 कोटी बजेटच्या या सिनेमाने तेव्हा 50 कोटींचा बिझनेस केला होता. त्याच्या या चित्रपटाचा ‘कबीर सिंग’ हा हिंदी रिमेक बनवला गेला.
2018 साली विजयने 6 सिनेमे केलेत. यापैकी महानटी, गीता गोविंदम ब्लॉकबस्टर तर टॅक्सीवाला हिट ठरला होता. त्याचे उर्वरित तीन सिनेमे दणकून आपटले होते.
2019 मध्ये विजय देवरकोंडा ‘डिअर कॉम्रेड’ या सिनेमात दिसला. या सिनेमातील त्याची व रश्मिका मंदानाची जोडी लोकांना भलतीच भावली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. पण याचं हिंदी डब व्हर्जन टीव्हीवर आलं तेव्हा लोकांनी हा सिनेमा डोक्यापर घेतला.
2020 मध्ये विजय ‘वर्ल्ड फेमस लव्हर’मध्ये दिसला. हा सिनेमा फ्लॉप ठरला. 2021 मध्ये आलेला त्याचा ‘जथि रत्नालु’ मात्र ब्लॉकबस्टर ठरला.