list of 9 celebrity who going to marry with younger male from their age
सुश्मिता नाही एकटी, या सेलिब्रिटींनीही निवडला स्वत:पेक्षा लहान वयाचा जोडीदार!! By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:55 PM2018-11-20T12:55:07+5:302018-11-20T13:11:21+5:30Join usJoin usNext सुश्मिता सेन स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान रोहमन शॉलला डेट करतेय. पण स्वत:पेक्षा लहान वयाच्या मुलावर भाळणारी सुश्मिता बॉलिवूडची एकटी अभिनेत्री नाही. तिच्याशिवाय आणखीही ब-याच अभिनेत्री स्वत:पेक्षा लहान वयाच्या मुलावर भाळल्या आहेत. अशाच ९ अभिनेत्रींविषयी... मलायका अरोरा व अर्जुन कपूर - मलायका व अर्जुनच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरात आहेत. अर्जुन मलायकापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. प्रियांका चोप्रा व निक जोनास- प्रियांकाने स्वत:पेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या निक जोनासला आपला जोडीदार म्हणून निवडले आहे. लवकरच प्रियांका अमेरिकेन सिंगर निक जोनाससोबत लग्नबेडीत अडकणार आहे. नेहा धूपिया व अंगद बेदी - नेहा व अंगद यांनी यावर्षी मे महिन्यात लग्न केले. लग्नाच्या सहा महिन्यानंतर नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अंगद हा नेहापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. श्वेता त्रिपाठी व चैतन्य शर्मा- यंदा २९ जूनला श्वेता व चैतन्य यांचे लग्न झाले. श्वेता ३३ वर्षांची आहे तर चैतन्य तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. बिपाशा बासू व करण सिंग ग्रोव्हर - सन २०१६ मध्ये लग्न करणारे करण व बिपाशा यांच्या वयातही बराच फरक आहे. करण हा बिपाशापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. उर्मिला मातोंडकर व मोहसिन अख्तर मीर - उर्मिलाने स्वत:पेक्षा नऊ वर्षांनी लहान असलेल्या मोहसिनसोबत लग्न केलेय. प्रिती झिंटा व जीन गुडइनफ - प्रिती २०१६ मध्ये अमेरिकन फोटोग्राफर जीन गुडइनफसोबत लग्नबंधनात अडकली. तिचा पती जीन तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. फराह खान व शिरीष कुंदर - फराह व शिरीष पहिल्यांदा मैं हू ना या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. २००४ मध्ये दोघांनीही विवाह केला. शिरीष हा फराहपेक्षा आठ वर्षांनी लहान आहे.टॅग्स :मलायका अरोराप्रीती झिंटाबिपाशा बासूउर्मिला मातोंडकरMalaika Arora KhanPreity ZintaBipasha BasuUrmila Matondkar