Lokmat Most Stylish Awards 2018 : ‘सिम्बा’ आला अन् त्याने जिंकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 23:26 IST2018-12-19T23:09:28+5:302018-12-19T23:26:36+5:30

‘सिम्बा’ या बहुप्रतिक्षीत आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा रणवीर सिंग आला अन् त्याने जिंकले. होय, लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर ‘सिम्बा’ची दमदार एन्ट्री झाली आणि सोहळ्यात जणू चैतन्य अवतरले.

त्याचा स्टायलिश लूक सगळ्यांत लक्षवेधी ठरला.

लेदर जॅकेट, गळ्यात गोफ, डोळ्यांवर गॉगल अशा अवतारात ‘सिम्बा’ने एन्ट्री घेतली.

रणवीरने येताच सगळीकडे उत्साह पेरला

‘सिम्बा’ या चित्रपटातील रणवीरची को-स्टार सारा अली खान हिचा जलवाही यावेळी दिसला.