'हे' आहेत बॉलिवूडचे प्रसिद्ध पुरुष मेकअप आर्टिस्ट; त्यांचं मानधन ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 11:48 AM2023-11-29T11:48:03+5:302023-11-29T11:54:51+5:30

Bollywood male makeup artists: 'या' मेकअप आर्टिस्टशिवाय घराबाहेर पडत नाही अभिनेत्री; एका वेळच्या मेकअपसाठी चार्ज करतात इतके लाख

सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यातही खासकरुन अभिनेत्रींसारखं दिसावं अशी तर अनेक जणींची इच्छा असते. परंतु, या अभिनेत्रींना सुंदर करण्यामागे काही मेकअप आर्टिस्ट आहेत.

आज आपण अशा बॉलिवूड मेकअप आर्टिस्टविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्या शिवाय माधुरी दिक्षितपासून निता अंबानींपर्यंत अनेक सेलिब्रिटींचं पानही हलत नाही.

मिक्की कॉन्ट्रॉक्टर- मागील ३० दशकांपासून मिक्की कॉन्ट्रॅक्टर हे नाव इंडस्ट्रीमध्ये गाजत आहे. बॉलिवूड अभिनेत्रींसह नीता अंबानी, इशा अंबानी यांचाही ते कायम मेकओव्हर करत असतात.

मिक्की कॉन्ट्रॉक्टर यांच्या क्लाएंट लिस्टमध्ये माधुरी दिक्षित, ऐश्वर्या राय, काजोल, करीना कपूर, आलिया भट्ट यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींचा समावेश आहे. मिक्की बऱ्याचदा श्रीदेवी यांचाही मेकअप करायचे. मिक्की एक वेळच्या सिटिंगसाठी ३० हजार रुपये मानधन घेतात. तर, संपूर्ण दिवसासाठी ते ७५ हजार ते १ लाख रुपये चार्ज करतात.

लारा दत्ता, कंगना रणौत यांसारख्या अभिनेत्रींसह क्लिंट फर्नांडीजने फेमिना मिस इंडिया २०१७ साठी मानुषी छिल्लर हिचाही मेकओव्हर केला होता.

बॉलिवूडमधला सर्वात महागडा मेकअप आर्टिस्ट म्हणून क्लिंटकडे पाहिलं जातं. तो एक वेळच्या मेकअपसाठी ७५ हजार ते दीड लाख रुपये चार्ज करतो.

विद्याधर भट्टे हे १९७४ पासून इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांनी परिणीतापासून ते मुन्नाभाई एमबीबीएसपर्यंत अनेक सिनेमांसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. मुन्नाभाई सिनेमात त्यांनी दिलीप प्रभावळकर यांचा महात्मा गांधी लूक केला होता.धर्मवीर सिनेमातही प्रसाद ओकला आनंद दिघे यांचा लूक त्यांनीच दिला होता. ते एका मेकअपसाठी ५० ते ७० हजार रुपये घेतात.

पॉम्पी हंस - करीना कपूरचा खास मेकअप आर्टिस्ट असलेला पॉम्पी हंस याचा स्वत:चा मेकअप स्टुडिओदेखील आहे. पॉम्पीची एक टीम आहे त्यामुळे ते लग्न कार्यातही मेकअप करतात.

त्याची टीम एका विवाहसोहळ्यासाठी २ लाख ८० हजार रुपये चार्ज करते. तसंच पॉम्पी सेलिब्रिटींचा मेकअप करण्यासाठी एका दिवसासाठी १ लाख रुपये फी चार्ज करतो.