बॉलिवूडचे ‘हे’ स्टार्स चक्क भाड्याच्या घरात राहतात...; महिन्याचं भाडं ऐकून फुटेल घाम...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 05:25 PM2022-04-03T17:25:29+5:302022-04-03T17:33:04+5:30

Bollywood : बॉलिवूडचे अनेक स्टार्स कोट्यवधी रूपये कमावतात, पण अजूनही भाड्याच्या घरात राहतात... विश्वास बसत नाही, पण हे खरं आहे...

माधुरी दीक्षित ही पती श्रीराम नेने यांच्यासोबत मुंबईच्या एका पॉश भागात एका अपार्टमेंटमध्ये भाड्यानं राहते. काही महिन्यांपूर्वीच तिने हे अपार्टमेंट भाड्यानं घेतलं. या अपार्टमेंटचं भाडं कितीये माहितीये तर महिन्याला 12.50 लाख रूपये.

कतरिना कैफ व विकी कौशल यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. दोघंही मुंबईच्या जुहू भागातील राजमहलच्या 8 व्या माळ्यावरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्यानं राहतात. 5 वर्षांसाठी कॅट व विकीनं हे अपार्टमेंट भाड्यानं घेतलं आहे. याचं भाडं दरमहा 8 लाख रूपये आहे.

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांचं नावही या यादीत आहे. दोघं मुंबईतील एका पॉश भागातील प्रभावती टॉवरमध्ये भाड्यानं राहतात. यासाठी दरमहा 7 लाख 25 हजार रूपये भाडं मोजतात.

क्रिती सॅननने नुकतंच अमिताभ बच्चन यांचं अंधेरीतील एक घर भाड्यानं घेतलं आहे. यासाठी ती दरमहा 10 लाख रूपये भाडं देते. याआधी ती आईवडिल व बहिणीसोबत राहायची.

बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन जुहूमधील रेंटच्या अपार्टमेंटमध्ये राहतोय. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या बंगल्याच्या अगदी जवळ राहतो. तो जवळपास एक वषार्पासून तिथं राहत आहे आणि एका वेबसाइट नुसार दरमहा तो 8.25 लाख रुपये भाडं देतोय.

श्रीलंकेचं सौंदर्य आणि माजी मिस युनिव्हर्स श्रीलंका जॅकलिन फर्नांडिज सी-फेसला पाच बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये राहते. रिपोर्टनुसार जॅकलिन सध्या दरमहा 6.78 लाख रुपये भाडं देत आहे.

परिणीती चोप्रा परिणीती अजूनही तिच्या स्वप्नातील घर शोधत आहे. ती अजूनही मुंबईतील 2 बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये भाडेकरू म्हणून राहते.