Mahima Chaudhry : "मला मोठा धक्का बसला, तो माझ्या पाठीमागे दुसरं कोणाला तरी डेट करत होता"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:59 IST2025-03-01T16:54:10+5:302025-03-01T16:59:22+5:30
Mahima Chaudhry : महिमा चौधरीच्या पर्सनल लाईफमध्ये खूप उलथा-पालथ झाली आहे.

अभिनेत्री महिमा चौधरीच्या पर्सनल लाईफमध्ये खूप उलथा-पालथ झाली आहे. लग्न आणि मुलीला जन्म देईपर्यंत अभिनेत्रीने अनेक समस्यांचा सामना केला आहे.
महिमा लिएंडर पेससोबत रिलेशिपमध्ये असल्याने देखील चर्चेत होती. ते जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
सोशल मीडियावर सध्या एका जुन्या न्यूज रिपोर्टची क्लिप व्हायरल होत आहे. यात ब्रेकअपची चर्चा सुरू होती आणि महिमाने याला उत्तर दिलं होतं.
"मला मोठा धक्का बसला जेव्हा मला समजलं की, माझ्या पाठीमागे तो दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे."
"तो माझ्या आयुष्यातून निघून गेल्यावरही माझ्या आयुष्यात काही बदल झाला नाही" असं महिमाने म्हटलं आहे.
महिमाने सिंगल मदर असण्यावरही भाष्य केलं होतं. "मी सिंगल मदर होती आणि मला पैशांची गरज होती."
"एक मुलगी असल्यावर चित्रपटात काम करणं अवघड आहे कारण त्यासाठी खूप जास्त वेळ द्यावा लागतो" असं अभिनेत्रीने सांगितलं
महिमा चौधरीचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.