आईपेक्षाही कैकपटीने सुंदर दिसते महिमा चौधरीची लेक; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 18:57 IST2022-04-17T18:46:48+5:302022-04-17T18:57:00+5:30

Mahima chaudhry: ariana अन्य स्टारकिड्सप्रमाणे फारशी प्रकाशझोतात नसते. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्याचा नेटकऱ्यांचा कायम प्रयत्न असतो.

'परदेस गर्ल' या नावाने खासकरुन ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी.

१९९७ मध्ये परदेस या चित्रपटातून महिमाला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

उत्तम अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या महिमाचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय असते.

अनेकदा महिमा तिच्या ग्लॅमरस फोटोसह तिच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर करत असते.

अलिकडेच महिमाने तिच्या लेकीसोबत काही फोटो शेअर केले. हे फोटो पाहिल्यावर सौंदर्याच्या बाबतीत महिमाची लेक तिच्यावर मात करत असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.

महिमा चौधरीच्या लेकीचं नाव ariana mukherji असं आहे.

ariana महिमाइतकीच सुंदर असून सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा सुरु आहे.

ariana अन्य स्टारकिड्सप्रमाणे फारशी प्रकाशझोतात नसते. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्याचा नेटकऱ्यांचा कायम प्रयत्न असतो.