मलायका अरोराचा क्रश कोण होता माहितीये का? नव्वदीतील 'या' अभिनेत्यासाठी होती वेडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 02:52 PM2024-10-03T14:52:08+5:302024-10-03T16:20:03+5:30

अभिनेत्याचं नाव ऐकून व्हाल चकीत.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेतील सेलिब्रिटी म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora). मलायका सिनेमांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

५० वर्षीय मलायकाची फॅशन हे तिचं वेगळेपण. या वयातही ती कमालीची फीट असून वेगवेगळी स्टाईल करत असते. तिचे जिम लूक्स तर ट्रेंड होतात. मलायकाचा 'वॉक' ही सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.

अशी ही चाहत्यांची आवडती मलायका मात्र तरुण वयात एका अभिनेत्यासाठी वेडी होती. तिने त्या अभिनेत्याचे पोस्टरही घरात लावले होते. हॉट अँड बोल्ड असलेल्या मलायकाला कोणता अभिनेता आवडायचा माहितीये का?

तर तो अभिनेता चंकी पांडे. होय, ८० ते ९० च्या दशकात अनेक मुली चंकी पांडेवर फिदा होत्या. त्यातच एक मलायकाही होती असा खुलासा एका शोमध्ये झाला होता. चंकी पांडे मलायकाचा सिक्रेट क्रश होता.

एका डान्स रिएलिटी शोमध्ये मलायका जज होती. तिथे चंकी पांडे पाहुणा म्हणून आला होता. यावेळी शोचा होस्ट मनीष पॉलने मलायकाबद्दल खुलासा केला. तो म्हणाला की चंकी पांडे अनेक मुलींचा त्याकाळी क्रश होता. त्यातलीच एक आज इथे आहे ती म्हणजे मलायका.

हे ऐकून चंकी पांडेही शॉक होतो. तर मलायका लाजते. ती म्हणते, "हे अगदी खरं आहे. तेव्हा मला तो खूप आवडायचा. इतका की मी त्याचे पोस्टर बाथरुममध्ये लावले होते. "

ती पुढे म्हणाली, "मी आणि माझी छोटी बहीण आम्ही दोघी चंकीला ब्लँक कॉल्सही लावायचो. चंकी पण खूप खोडकर होता. तोही फोन उचलून ओरडून म्हणायचा हॅलो मी चंकी बोलतोय."

१९९८ मध्ये मलायका अरबाज खानसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नाच्या तब्बल १९ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. नंतर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली. सध्या त्यांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे.