Malaika Arora : "मुलाचे मित्र विचारतात, तुझी आई काय काम करते?"; मलायका अरोराने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:57 PM2024-08-12T12:57:43+5:302024-08-12T13:14:31+5:30

Malaika Arora And Son Arhaan Khan : मलायका अरोराने आपल्या मुलासोबत असलेल्या इक्वेशनबाबत भाष्य केलं आहे. मलायकाने असंही सांगितलं की, तिच्या मुलाचे मित्र हे तिच्या प्रोफेशनबद्दल कन्फ्यूज होते.

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या पॅरिसमध्ये आहे. येथे ती ऑलिम्पिकचा आनंद लुटत आहे. अलीकडेच तिने आपल्या मुलासोबत असलेल्या इक्वेशनबाबत भाष्य केलं आहे. मलायकाने असंही सांगितलं की, तिच्या मुलाचे मित्र हे तिच्या प्रोफेशनबद्दल कन्फ्यूज होते.

Harper's Bazaar शी झालेल्या संवादात मलायका म्हणाली, "एक दिवस माझ्या मुलाने मला सांगितलं की, मी नेमकं काय काम करते याबद्दल त्याचे मित्र कन्फ्यूज झाले आहेत. ते म्हणतात की, मी चित्रपट आणि काही गाणी केली आहेत."

"मी व्हीजे देखील झाले आहे. मी मॉडेलिंगही केलं आहे आणि टीव्हीवरही मी दिसत असते. त्यामुळे ते कन्फ्यूज झाले आहेत. पण मी जे काही करते त्याबद्दल मला काही सांगायची गरज वाटत नाही. मला ज्यातून आनंद मिळेल ते मी करते."

मलायका अरोराने यासोबतच ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. निगेटिव्ह प्रतिक्रियांचा खूप त्रास होतो असं म्हटलं आहे. पण यातून ती आता बाहेर येत आहे. ती यासर्व गोष्टींसमोर ठाम उभी राहून याचा सामना करत असल्याचं म्हणते.

मलायका तिच्या डान्ससाठी लोकप्रिय झाली आहे. छैय्या छैया, मुन्नी बदनाम हुई, अनारकली डिस्को चली यांसारख्या हिट बॉलिवूड गाण्यांसाठी ती ओळखली जाते. मलायकाच्या डान्स मूव्ह्ज खूपच जबरदस्त आहेत.

अभिनेत्रीच्या डान्सची नेहमीच चर्चा रंगलेली असते. याशिवाय अभिनेत्री डान्स रिएलिटी शोसारखे टीव्ही शोज जज करते. मलायका २०२२ मध्ये स्वतःचा शो घेऊन आली होती. Moving in with Malaika असं या शोचं नाव होतं.

वैयक्तिक आयुष्यात मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली. दोघेही बराच काळ एकत्र राहत होते. मात्र, आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. मात्र अर्जुन किंवा मलायका या दोघांनीही ब्रेकअपवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्रीच्या अदांवर चाहते घायाळ होतात.