एका मुलाची आई असूनही ही अभिनेत्री फिटनेसमध्ये सर्वांना देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:37 IST2020-04-16T16:37:11+5:302020-04-16T16:37:11+5:30

फिटनेस व ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री मंदिरा बेदीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला.

मीडिया व वृत्तापासून दूर राहणारी मंदिरा नेहमी लूकमुळे चर्चेत येत असते.

अभिनयाशिवाय मंदिरा फॅशन डिझायनर, मॉडेल व टीव्ही प्रेझेंटरदेखील आहे.

शांती या मालिकेतून लोकप्रिय झालेली मंदिरा वयापेक्षा खूप लहान वाटते. ती एका मुलाची आईदेखील आहे.

मंदिरा सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.

तिच्या फिटनेस व सौंदर्यांमुळे खूप तरूणी तिला फॉलो करतात.

प्रेग्नेंसीदरम्यान मंदिराने 22 किलो वजन वाढविले होते. आई झाल्यानंतर तिने फक्त वजनच कमी केले नाही तर आधीसारख्या शेपमध्ये आली.

मंदिरा नुकतीच साहो चित्रपटात झळकली होती.

इंटरेस्टिंग बाब ही आहे की क्रिकेट कॉमेंटरी देणारी मंदिरा पहिली महिला आहे.