शेवटी कपिल शर्मा शोमध्ये झळकलेले अतुल परचुरे, बॉलिवूड सेलिब्रिटीही झालेले अभिनेत्याचे फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 04:52 PM2024-10-15T16:52:50+5:302024-10-15T17:13:51+5:30

अतुल परचुरेंनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरेंनी कारकीर्दीच्या शेवटच्या काळात कपिल शर्मा शो सुद्धा गाजवून बॉलिवूड सेलिब्रिटींना वेड लावलं

अतुल परचुरेंचं काल १४ ऑक्टोबरला वयाच्या ५७ व्या वर्षी दुःखद निधन झालं. अतुल यांच्या निधनाने सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे

अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात केली होती. याशिवाय ते पुन्हा अभिनयक्षेत्रात सक्रीय होणार होते. पण त्यांनी अखेरचा श्वास घेतला

अतुल परचुरेंच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील एक हरहुन्नरी तारा निखळल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे

अतुल परचुरेंचं नाव खुद्द पु.ल.देशपांडेंनी व्यक्ती आणि वल्ली नाटकासाठी सुचवलं. हे नाटक अतुल परचुरेंनी लोकप्रिय केलं

सर्कस सिनेमाच्या प्रमोशनवेळी रणवीर सिंग जेव्हा कपिल शर्मा शोमध्ये आलेला तेव्हा अतुल परचुरेंनी त्यांच्यासोबत खास फोटो काढला

अभिनेत्री काजोल कपिल शर्मा शोमध्ये आलेली तेव्हा तिच्यासोबत अतुल परचुरेंनी काढलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला

गदर फेम तारा सिंग अर्थात अभिनेता सनी देओलनेही अतुल परचुरेंसोबत खास फोटोशूट केलं.