Anusha Dandekar Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट! चाहतेही झाले 'बोल्डनेस'वर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 21:46 IST2022-07-14T21:30:47+5:302022-07-14T21:46:04+5:30

तुम्ही पाहिलंत का या अभिनेत्रीचं नवं फोटोशूट?

मराठमोळी मॉडेल, अभिनेत्री आणि अँकर अनुषा दांडेकर ही नेहमीच तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते.

अनुषा दांडेकर हॉट फोटोंसह वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींमुळेही चर्चेचा विषय बनली आहे.

अनुषा ही बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरची बहिण आहे.

अनुषा दांडेकरने नुकताच एक बोल्ड आणि हॉट फोटोशूट केला आहे. या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

अनुषाने बोल्ड फोटोशूट केलं असून यात ती एका आलिशान काउचवर बसून पोज देताना दिसली.

अनुषाने गुलाबी रंगाचा थाय-हाय स्लिट स्कर्ट परिधान केला होता.अनुषाने MTV च्या एका शो पासून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली.

त्यानंतर तिने इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडेल, लव्ह स्कूल, सुपरमॉडेल ऑफ द ईअर अशा रिअँलिटी शो मध्ये जज म्हणून सहभाग नोंदवला.

अनुषा ही मॉडेल करण कुंद्रासोबत काही वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याने तिचे वैयक्तिक आयुष्यही चांगलेच चर्चिले गेले.

सध्या तिच्या नव्या फोटोशूटमधील फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.