‘जुम्मा चुम्मा दे दे…’ या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्ध झाली होती ही मराठमोळी अभिनेत्री, तरीही 28 वर्षापूर्वीच बॉलिवूडला ठोकला रामराम By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 04:00 PM 2020-07-07T16:00:04+5:30 2020-07-07T16:14:25+5:30
८० च्या दशकात किमी काटकरने “पत्थर दिल” सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यानंतर तिला एकसे बढकर एक सिनेमाच्या ऑफर्सही येऊ लागल्या. मेरा लहू, दरिया दिल, सोने पे सुहागा, खून का कर्ज हे सिनेमा तिने साकारले पण यात म्हणावे तसे यश तिला मिळाले नाही. १९९१मध्ये अमिताभ बच्चनची हिरोईन म्हणून ‘हम’ सिनेमात तिने भूमिका साकरली. ‘जुम्मा चुम्मा दे दे…’ या गाण्यामुळे किमी काटकरला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली.
सिनेमाही हिट ठरला होता. मात्र त्यानंतर किमीने सिनेमाच्या ऑफर्स नाकारल्या.
अनिल कपूर सोबत १९९२मध्ये तिने ‘हमला’ हा सिनेमा केला आणि बॉलिवूडला कायमचे अलविदा म्हटे. त्याच त्या दुय्यम भूमिका साकारण्याचाही कंटाळा आला होता.
तसेच कामातही काही वेगळेपण जावणत नव्हते. अखेर तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेत बॉलिवूडमधून एक्झिट घेतली. किमीने ऍडफिल्ममेकर ‘शंतनू शौरी’ सोबत लग्न केले. लग्न करून ती मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झाली.
बॉलिवूडमध्ये अनेक उदाहरणं आहेत ज्यांचे करिअर फ्लॉप झाल्यानंतर त्यांनी इंडस्ट्री सोडली आणि लग्न करत सेटल झाल्या. याच यादीत मराठमोळी अभिनेत्री किमी काटकरचे नाव आवर्जून घेतले जाते.
कोणतंही क्षेत्र असो त्यात स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. मात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत.
अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, अनिल कपूर ह्यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करूनही किमी काटकरला या इंडस्ट्रीत राहावेसे वाटले नाही.
किमीने जवळपास ३० तरी चित्रपट या बॉलिवूड सृष्टीला दिले आहेत.
लोकांच्या वाईट नजरा आणि मागून अपशब्द तसेच टोमणे मारणे करणे …अशी तुच्छतेची वागणूक मिळू लागल्याने मला या क्षेत्रात फारसा इंटरेस्ट राहिला नाही त्यामुळे यापुढे मी चित्रपट स्वीकारणे बंद केले आहे.
८० च्या दशकात किमी काटकरने “पत्थर दिल” सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते.