वयाच्या १५व्या वर्षी लग्न, प्रेग्नेंसीत शूट केला होता रेप सीन; मग अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 05:22 PM2023-07-08T17:22:41+5:302023-07-08T17:29:08+5:30

एका घटनेनंतर या अभिनेत्रीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.

७०-८०च्या दशकात मौसमी चॅटर्जी यांनी तिच्या अभिनयाची अशी चुणूक दाखवली की आजही लोक त्यांची प्रशंसा करताना थकत नाहीत. रोटी कपडा और मकान, अनुराग, प्यासा सावन, घर एक मंदिर यांसारख्या अनेक चित्रपटातून नाव कमावणाऱ्या मौसमी चॅटर्जींचा करिअरचा प्रवास खूपच वेगळा होता.

त्या काळातील अभिनेत्री लग्नानंतर चित्रपटांपासून दूर राहायच्या, तर मौसमी यांनी लग्नानंतरच फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. होय... मौसमी चॅटर्जींचे लग्न अवघ्या १५ वर्षांत झाले. मौसमी चॅटर्जी यांनी तिच्या पती आणि सासरच्या सांगण्यावरून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती, या अभिनेत्रीचा पहिला चित्रपट बालिका वधू होता.

१९६७ मध्ये बालिका वधू हा चित्रपट केल्यानंतर, मौसमी चॅटर्जी यांच्याकडे चित्रपटांची लाइन लागली. अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, जेव्हा अभिनेत्रीचे करिअर शिखरावर होते, तेव्हा ती गर्भवती राहिली.

१९७४ मध्ये रोटी, कपडा और मकान या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री गरोदर होती, यादरम्यान तिने बलात्काराचे दृश्य चित्रित केले होते. हा सीन इतका संवेदनशील होता की शूटिंगनंतर मौसमी चॅटर्जी यांना रक्तस्त्राव होऊ लागला.

वृत्तांनुसार, मौसमी चॅटर्जी यांना दोन मुली होत्या. ज्यामध्ये पायल मुखर्जी मोठी मुलगी आणि मेघा मुखर्जी धाकटीचे नाव आहे. पण त्यानंतर २०१९ मध्ये अभिनेत्रीच्या मोठ्या मुलीचा मधुमेहामुळे मृत्यू झाला. आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर मौसमी चॅटर्जी पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या.

आपल्या मुलीच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही आणि त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या, असं म्हटलं जातं. मौसमी चॅटर्जी नुकत्याच कपिल शर्मा शोमध्ये पाहुणी म्हणून पोहोचल्या होत्या.

या घटनेने सेटवर उपस्थित सर्वांनाच हादरवून सोडले. जरी अभिनेत्रीचे मूल पूर्णपणे सुरक्षित होते. मौसमी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.