Before marrying Saif Ali Khan, Amrita Singh had affair 'this' cricketer
सैफ अली खान सोबत लग्न करण्याआधी अमृता सिंगने 'या' क्रिकेटर सोबत केला होता साखरपुडा... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:09 PM2020-03-30T16:09:19+5:302020-03-30T16:21:46+5:30Join usJoin usNext अमृता सिंग आणि सैफ अली खानबद्दल सर्वांनाच माहित आहे. सैफच्या आधी अमृता भारतीय क्रिकेटर 'रवी शास्त्री' यांना डेट करत होती या क्रिकेटरसोबत अमृताचा साखरपुडादेखील झाला होता. अमृता आणि रवी यांनी १९८६ मध्ये साखरपुडा केला होता. ८० च्या दशकातील रवी आणि अमृताच्या अफेरच्या चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या. अमृता आणि रवी यांनी एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले होते फोटोशूटनंतर दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे मान्याता दिली रवी शास्त्री यांना अभिनेत्री पत्नी नको हवी होती. अमृता त्याकाळची गाजलेली अभिनेत्री होती आणि ती आपले करिअर सोडू शकत नव्हती. यामुळे या दोघांची लव्हस्टोरी जास्त काळ टिकू शकली नाही. १९९० मध्ये रवी यांनी रितू सिंगशी विवाह केला तर, अमृताने १९९१ मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं. सैफ कडून अमृताला 2 मूल आहेत. सारा अली खान आणि इब्राहिमअली खान. १२ वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर २००४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. सैफनी अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर ८ वर्षांनी अभिनेत्री करीना कपूरशी दुसरं लग्न केल.टॅग्स :बॉलिवूडसैफ अली खान रवी शास्त्रीbollywoodSaif Ali KhanRavi Shastri