Made For Each Other Couple मिलिंद सोमण आणि अंकिताच्या लग्नाला 3 वर्षे पूर्ण, पाहा त्यांचे Latest Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 15:32 IST2021-07-13T15:17:24+5:302021-07-13T15:32:32+5:30
मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर यांच्या हटके लग्नाची चांगलीच चर्चा झाली. कारण नवरा मुलगा ५२ वर्षाचा तर नवरीचे वय २७ वर्षे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही अखेर हे कपल रेशीमगाठीत अडकत सुखाने संसार करत आहेत.

मिलिंद आणि अंकिताच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहे. आज त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे.
मिलिंदने खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत पत्नी अंकिताला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान शेअर केलेल्या फोटोत दोघांचाही रोमँटीक अंदाज पाहायला मिळत आहे.
दोघांच्याही आवडी- निवडी सारख्याच आहेत. त्यामुळे मेड फॉर इच अदर कपल आहेत.
दोघेही फिटनेस फ्रिक आहेत. वारंवार दोघेही फिटनेस मंत्रा शेअर करत इतरांनाही प्रेरणा देत असतात.
अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे.
दीड वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मिलिंद आणि अंकिता लग्नबंधनात अडकले होते.
अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.