Mister Mummy: रितेश देशमुख आणि जेनेलियाचा 'मिस्टर मम्मी' या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 04:14 PM2022-11-08T16:14:38+5:302022-11-08T16:23:00+5:30

Riteish Deshmukh and Genelia D'souza Deshmukh : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख स्टारर 'मिस्टर ममी' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख स्टारर 'मिस्टर ममी' 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

निर्मात्यांनी मंगळवारी याची घोषणा केली. या कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन 'बंटी और बबली'चे दिग्दर्शक शाद अली यांनी केले आहे.

'मिस्टर मम्मी'ची निर्मिती भूषण कुमार यांची कंपनी टी-सीरीज, कृष्ण कुमार, अली आणि शिव अनंत यांनी केली आहे.

टी-सीरीजने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आणि रिलीजच्या तारखेची माहिती दिली.

ट्विटमध्ये लिहिले आहे की, "तुम्हाला एका अनोख्या प्रवासावर घेऊन जाणारी आनंदाची बातमी! 'मिस्टर मम्मी' 18 नोव्हेंबर 2022 रोजी सिनेमागृहात.

'मिस्टर मम्मी' हा चित्रपट देशमुख आणि डिसोझा यांनी साकारलेल्या जोडप्याची कथा आहे.

'मिस्टर मम्मी'ची कथा एका जोडप्याभोवती फिरते (रितेश आणि जेनेलिया) ज्यांची मुलांबद्दल पूर्णपणे वेगळी विचारसरणी आहे.