मौनी रॉयनं आपल्या अदांनी सर्वांना लावलंय वेड, साडीतील फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 03:50 PM2024-07-07T15:50:19+5:302024-07-07T15:55:34+5:30

टेलिव्हिजन ते बॉलिवूडपर्यंत मजल मारलेली अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.

उत्तम अभिनयासोबतच मौनी तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. अनेक जण तिच्या बोल्डनेसचं कौतुक करतात.

देसी लूक असो वेस्टर्न मौनी रॉय ही प्रत्येक लूकमध्ये भारीच दिसते.

नुकतंच मौनी रॉय हिनं एक खास फोटोशूट केलं आहे. शीमरी साडीमध्ये मौनी खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सिझलिंग लूकमधील हॉट फोटो तिनं चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

या लूकसाठी अभिनेत्रीनं बोल्ड मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत.

फोटो शेअर करताना मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'एक साडी गर्ल फॉरएव्हर'.

मौनी रॉय तिच्या सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असते. कोणतीही फॅशन ती बिनधास्तपणे कॅरी करते.

आपल्या प्रत्येक लूकमधून चाहत्यांना घायळ करण्याची कला मौनीकडे आहे.

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती अलिकडेच प्रदर्शित झालेल्या अभिनेता इमरान हाश्मीच्या 'शोटाइम' सीरिजमध्ये दिसली होती.