'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये केलं अनोखं फोटोशूट, चाहते म्हणतात- "ओळखताच येत नाहीये!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:23 IST2025-01-17T12:57:31+5:302025-01-17T13:23:59+5:30
'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये खास फोटोशूट केलंय. त्यामुळे चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे (bajrangi bhaijaan)

'बजरंगी भाईजान' सिनेमात सलमान खानसोबत दिसणारी छोटी मुन्नी आठवत असेलच. हर्षाली मल्होत्रा असं तिचं नाव असून तिने लिफ्टमध्ये अनोखं फोटोशूट केलंय
हर्षाली मल्होत्राने लिफ्टमध्ये फोटोशूट करुन तिच्या मनमोहक अदा चाहत्यांना दाखवल्या आहेत. हर्षालीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी पसंती दिली आहे.
"ही मुन्नीच आहे का?", "छोटी मुलगी आता मोठी झाली?", "मुन्नीला आता ओळखता येत नाहीये", अशा कमेंट्स करत लोकांनी हर्षालीच्या फोटोंना पसंती दर्शवली आहे
लहान वयात चमकलेल्या हर्षालीने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ८३ टक्के गुण मिळवले. तेव्हापासून ती प्रकाशझोतात आली.
हर्षाली मल्होत्रा आता १५ वर्षांची असून ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि रील्सच्या माध्यमातून सक्रीय असते.
'इमर्जन्सी' असेल तर कृपया असं करु नका, असं खास कॅप्शन हर्षालीने या फोटोला दिलंय. हर्षाली सध्या तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतेय
काहीच दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये हर्षाली दिसली होती. त्यावेळी तिने 'बजरंगी भाईजान'मध्ये तिच्यासोबत काम केलेल्या नवाझुद्दीन सिद्दीकीची खास भेट घेतली. तेव्हा हर्षालीचं बदललेलं रुप बघून नवाझुद्दीनने सुद्धा तिला ओळखलं नाही.