'My son Arhan calls me by different names,' Malaika Arora said at the event
Malaika Arora: माझा मुलगा अरहान मला आई नव्हे, तर 'या' नावाने हाक मारतो; मलायका अरोराने केला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 04:55 PM2022-02-12T16:55:10+5:302022-02-12T17:04:50+5:30Join usJoin usNext बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याची एक्स वाइफ अभिनेत्री मलायका अरोरामुळे चर्चेत येत असतो. घटस्फोटानंतरही ते दोघे बऱ्याचदा एकत्र दिसतात. गेल्या काही दिवसांपूर्वी दोघेही विमानतळावर एकत्र दिसले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अरहान देखील पाहायला मिळाला. मलायका अरोरा आणि अरबाज खान एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी त्यांचा मुलगा अरहानसाठी ते अजूनही एकत्र आहेत. दोघेही आपल्या आयुष्यात कितीही व्यस्त असले तरी जेव्हा मुलाचा प्रश्न येतो तेव्हा ते एकत्र येतात. मलायकाने 'इंडियाज बेस्ट डान्सर २' या रिअॅलिटी शोमध्ये आता तिच्या आणि अरहानच्या नात्यातला आणखी एक खुलासा केला. मलायकाने सांगितले की, माझा मुलगा अरहान मला आई म्हणून हाक मारत नाही. तर तो नेहमी वेगवेगळ्या नावांनी हाक मारतो. तसेच अरहान मवा कधी 'ब्रो' म्हणूनही हाक मारतो, असं मलायकाने सांगितलं. मलायका ही चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायका अरोरा अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. यात अनेकदा तिच्या लक्झरी लाइफस्टाइलची चर्चा होतांना दिसते. विशेष म्हणजे वयाची ४५ वर्ष उलटल्यानंतरही तिचा फिटनेस आणि सौंदर्य तरुणींना लाजवेल असा आहे. आजही मलायका कलाविश्वातील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडMalaika Arora Khanbollywood