सरप्राईज द्यायला गेला अन् बदल्यात तिचं मन जिंकून आला....; वाचा अमला-नागार्जुनची लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 05:14 PM 2021-09-12T17:14:14+5:30 2021-09-12T17:22:03+5:30
Love Story in PICS : अभिनेत्री अमला अक्किनेनी हिचा आज वाढदिवस. अमलाची एक खास ओळख म्हणजे साऊथचा सुपरस्टार नागार्जुनची ती पत्नी. अमला आज तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री अमला अक्किनेनी हिचा आज वाढदिवस. अमलाची एक खास ओळख म्हणजे साऊथचा सुपरस्टार नागार्जुनची ती पत्नी. अमला आज तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे.
जन्म 12 सप्टेंबर 1967 रोजी कोलकात्यात जन्मलेल्या अमलानं सुपरस्टार नागार्जुनशी लग्न केलं. या दोघांची लव्हस्टोरी फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. होय, आज हीच लव्हस्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अमला नागार्जुनच्या प्रेमात पडली तेव्हा नागार्जुन आधीच विवाहित होता. अमलाचे म्हणाल तर, ती साऊथची सुपरस्टार होती. यश, पैसा, प्रसिद्धी सगळं काही तिच्या पायाशी लोळणं घेतं होतं.
नागार्जुनसोबत अमलानं अनेक सिनेमात काम केलं आणि एकत्र काम करता करता नागार्जुनच्या प्रेमात ती अक्षरश: वेडी झाली. पण या प्रेमाची सुरूवात झाली ती एका फिल्मी वाटाव्या अशा एका सीनने.
होय, ता अमला तिच्या एका चित्रपटाचं शूटिंग करत होती. नागार्जुन तिला सप्राईज देण्यासाठी सेटवर पोहोचला होता. पण पाहतो तर काय अमला रडत होती. पुढच्या सिनमध्ये मला जे कपडे घालायचे आहेत ते खूप विचित्र आहेत आणि मला ते घालायचे नाहीत, असं तिनं रडत रडत नागार्जुनला सांगितलं.
यावर नागार्जुन लगेच दिग्दर्शकाशी बोलला. मग काय, सुपरस्टारचा शब्द कोण खाली जाऊ देणार? दुसºयाच क्षणाला अमलाला तिचे कपडे बदलून मिळाले. नागार्जुनच्या या वागण्यानं अमला इम्प्रेस होणारच. ती अक्षरश: त्याच्यावर भाळली.
मग दोघांच्याही नात्याची चर्चा झाली झाली. अशाच एका सिनेमाच्या शूटींगसाठी अमला आणि नागार्जुन परदेशात गेले होते. जिथं नागार्जुनने अमलाला खास पद्धतीने प्रपोज केलं होतं.
अर्थात त्याआधी पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा होता. अमलाचा होकार मिळाल्यानंतर नागार्जुननं पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि 1992 साली नागार्जुन आणि अमला यांनी एकमेकांशी लग्न केलं.
अमला आणि नागार्जुन यांना आता एक मुलगा आहे. या मुलाचं नाव अखिल असं आहे. अखिल देखील एक अभिनेता आहे.