घटस्फोटानंतर लेकाला घेऊन गोव्याला गेली अभिनेत्री, बिकिनी लूकमध्ये शेअर केले Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:13 IST2025-04-10T16:02:26+5:302025-04-10T16:13:23+5:30
अभिनेत्रीचं तिच्या ट्रेनरसोबत अफेअर असल्याची चर्चा आहे.

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. गेल्या वर्षीच हार्दिक आणि नताशाचा (Natasa Stankovic) घटस्फोट झाला ज्याची सर्वात जास्त चर्चा रंगली. लग्नानंतर ४ वर्षांनी दोघं विभक्त झाले.
हार्दिक आणि नताशाचा मुलगा अगस्त्य ४ वर्षांचा आहे. लेकाला घेऊन ती काही दिवसांपूर्वीच गोव्याला गेली होती. तिने आता गोव्याचे काही फोटो शेअर केलेत.
नताशा मित्रपरिवारासोबत गोव्यातील बीचवर एन्जॉय करत आहे. यामध्ये तिच्यासोबत मोठी गर्लगँग दिसत आहे.
तसंच नताशाने गोव्यात बिकिनी लूकही फ्लॉन्ट केला आहे. फिटनेसबाबतीत नताशाचं नेहमीच कौतुक होतं. तिने एकदम टोन्ड स्लीम अँड ट्रीम फिगर ठेवली आहे.
हिरव्या रंगाच्या बिकिनीत तिने फोटो शेअर केलेत. गोव्यात बीचवर उन्हात ती निवांत वेळ घालवत आहे.
आणखी काही फोटोत अगस्त्यसोबतचे काही क्षण तिने कॅप्चर केलेत. माय-लेकाचे हे फोटो खूपच गोड आहेत.
नताशाने पुन्हा प्रेमात पडल्याचीही हिंट दिली होती. ट्रेनर अलेक्झांडरसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. त्याच्यासोबत ती अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.