neha kakkar rohan preet singh marriage singer vishal dadlani reacts
नवे कपडे शिवायला देऊ की लाईक-शेअर करू...? नेहा कक्करने विशाल ददलानीला केले कन्फ्युज By रूपाली मुधोळकर | Published: October 15, 2020 08:00 AM2020-10-15T08:00:00+5:302020-10-15T08:00:02+5:30Join usJoin usNext नेहू दा ब्याह... झूठ या सच्चा? चर्चेत राहणे नेहा कक्करला चांगलेच जमते. सध्या नेहा व रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहेत. येत्या 21 ऑक्टोबरला नेहूप्रीत लग्न करणार असे मानले जातेय. पण तूर्तास हे लग्न खरोखर होणार की हा सुद्धा प्रमोशनचा एक फंडा आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. केवळ चाहत्यांनाच नाही तर सिंगर विशाल ददलानी यालाही हाच प्रश्न पडला आहे. नेहूप्रीतच्या लग्नावर विशाल ददलानीने अशी काही प्रतिक्रिया दिली की, चाहते आणखीच कन्फ्युज झालेत. अरे मी पुन्हा कन्फ्यूज झालोय. नेहा व रोहनच्या लग्नाची चर्चा सुरु आहे की तुमच्या नव्या गाण्याची की चित्रपटाची. स्पष्ट स्पष्ट सांगा यार, कपडे शिवायचे की डाऊनलोड, शेअर व लाईक करायचे? असे विशाल ददलानीने लिहिले आहे. रॅपर बादशाह यानेही काहीशी अशीच प्रतिक्रिया दिली आहे. कन्फ्युजन है यार, असे त्याने लिहिलेय. आता या कन्फ्युजनची सुरुवात कशी झाली तर नेहाने शेअर केलेल्या पोस्टमुळे. ही पोस्ट वेगळेच काही सांगत आहे. ही पोस्ट बघता, नेहा व रोहनप्रीत प्रत्यक्षात लग्न करत नसल्याचे स्पष्ट होतेय. ही पोस्ट नेहा व रोहनप्रीतच्या एका गाण्याबद्दल आहे. या गाण्याचे पोस्टर नेहाने रिलीज केले आहे. हे पोस्टर शेअर करताना #NehuDaVyah by #NehaKakkar featuring My Rohu @rohanpreetsingh ♥️ 21st October असे तिने लिहिले आहे. हे गाणे 21 तारखेला रिलीज होतेय. यावरून लग्नाची चर्चा हा पुन्हा एकदा प्रमोशनचा फंडा असल्याचे चाहत्यांना वाटतेय. याआधीही ‘इंडियल आयडल’च्या सेटवर नेहा व आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या अशाच चर्चा रंगल्या होत्या. पण तो सुद्धा एक प्रमोशन फंडा होता. रोहनप्रीत सिंहचे नाव तुम्ही याआधीही ऐकले असेलच. ‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.टॅग्स :नेहा कक्करविशाल ददलानीNeha KakkarVishal Dadlani