यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 07:00 IST2025-01-03T07:00:00+5:302025-01-03T07:00:00+5:30

अनेक लक्षवेधी चित्रपटांनी नव वर्ष सजलेलं असणार आहे. चला तर मग बघूयात, २०२५ मध्ये कोणकोणते चित्रपट येणार आहेत.

२०२४ हे वर्ष चित्रपटांसाठी दमदार राहिले. 'पुष्पा २', 'स्त्री २', 'कल्की २८९८ एडी' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत नवे रेकॉर्ड बनवले. आता नवीन वर्ष तर अजून खास होणार आहे. कारण सलमान खान, आमिर खानपासून ते हृतिक रोशन, सनी देओल, आलिया भट, ऋषभ शेट्टी, राम चरण, विकी कौशल, प्रभास यांसारख्या सुपरस्टार्सचे चित्रपट आगामी काळात येणार आहेत. काहींची रिलीज डेट पण घोषित करण्यात आली आहे.

जानेवारीत 'गेम चेंजर' अन् 'इमर्जन्सी' : सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा 'गेम चेंजर' (Game Changer) चित्रपट १० जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. एस. शंकर दिग्दर्शित हा चित्रपट राजनीतीवर आधारित आहे. यात एका आयपीएस अधिकाऱ्यांची कहाणी दाखवली आहे. तसेच अभिनेत्री कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' (Emergency)चित्रपट अखेर १७ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. यात कंगना माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. १९७५ ते १९७७ दरम्यानच्या आणीबाणी काळावर आधारित हा चित्रपट आहे.

फेब्रुवारीत 'छावा' अन् 'देवा' : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा 'छावा' (Chhaava). अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा २' सोबत रिलीज होणार होता. परंतु, फेब्रुवारीपर्यंत तो टाळण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची कहाणी आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक रोशन अँड्र्यूज यांचा ॲक्शन थ्रिलर 'देवा' (Deva) मध्ये अभिनेता शाहिद कपूरसोबत (Shahid Kapoor) अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी येईल.

ईदला 'सिकंदर' : सलमान खान (salman khan ) याचा 'सिकंदर' (Sikandar) २०२५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस येऊ शकतो. ए. आर. मुरुगादोस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचा टीजर धमाल उडवणार आहे.

एप्रिलमध्ये 'द राजा साब', 'जाट' अन् 'जॉली एलएलबी ३' : प्रभासचा (Prabhas ) आगामी चित्रपट 'द राजा साब' (The Raja Saa) १० एप्रिलमध्ये चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांत रिलीज होणार आहे. चित्रपटात मालविका मोहनन, निधी अग्रवाल आणि ब्रह्मानंदम हे दिसतील. तर एप्रिलमध्ये 'जाट' (JAAT ) येणार आहे. सनी देओलचा ॲक्शन-थ्रीलरपट 'जाट'चा टीजर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. यात तो ॲक्शन अवतारात दिसेल. तसेच अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा कोर्ट रूम कॉमेडी ड्रामा 'जॉली एलएलबी ३' (Jolly LLB 3) आगामी १० एप्रिल रोजी रिलीज होईल. यापूर्वीचे दोन्ही भाग हिट झाले आहेत.

मे मध्ये 'सितारे जमीन पर' अन् 'रेड २' : २०२५च्या मे महिन्यात 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) हा चित्रपट रिलीज होईल. २००७ मध्ये 'तारे जमीन पर' हा चित्रपट आला होता. त्याचा हा सिक्वेल आहे. तसेच अजय देवगणचा क्राईम-थ्रिलर 'रेड'चा सिक्वेल मे महिन्यात येईल. याच्या 'रेड २' (Raid 2) या सिक्वेलमध्ये आयआरएस अमय पटनायक यांच्या रूपात अजय देवगण दिसेल.

जूनमध्ये 'ठग लाइफ' अन् 'हाऊसफुल्ल ५' : कमल हसन आणि सिलंबरासन टीआर यांचा 'ठग लाइफ' (Thug Life) ५ जून रोजी रिलीज होणार आहे. यात जयम रवी, तृषा अभिरामी आणि नासर हे कलाकार यात दिसतील. तर अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल्ल ५' (Housefull 5) हा कॉमेडी चित्रपट ६ जून रोजी रिलीज होणार आहे. याच्या फ्रेंचाईजी चित्रपटात रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, सोनम बाजवा आणि फरदीन खान दिसतील.

जुलैमध्ये 'परम सुंदरी' : सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांच्या रोमँटिक ड्रामा 'परम सुंदरी' चित्रपटाचा लूक अशातच आला. हा चित्रपट २५ जुलै रोजी रिलीज होईल.

ऑगस्टमध्ये 'वॉर २' : २०१९ मध्ये आलेल्या 'वॉर' चित्रपटाचा सिक्वेल'वॉर २' (War 2)मध्ये अजून एकदा हृतिक रोशनला कबीरच्या भूमिकेत चाहते बघण्यास उत्सुक आहेत. आता यात ज्युनिअर एनटीआर आणि कियारा अडवाणी यासारखे कलाकार दिसतील. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी येईल.

सप्टेंबर-ऑक्टोबर : ५ सप्टेंबर २०२५ ला 'बागी ४' (Baaghi 4) हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तर २०२५च्या ऑक्टोबर महिन्यात 'कांतारा चॅप्टर १' (Kantara: Chapter 1) प्रदर्शित केला जाणार आहे. २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीच्या मुहुर्तावर 'कांतारा चॅप्टर १' थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. २०२५ मध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर 'थामा' (Thama) रिलीज होणार आहे. 'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या', 'स्त्री २' नंतर 'थामा' सिनेमा या हॉरर युनिव्हर्सचा पुढील भाग असणार आहे. आयुषमान खुराना, रश्मिका मंदाना हे दोघे सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर नवाझुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल हे अभिनेतेही विशेष भूमिकेत दिसणार आहेत.

नोव्हेंबर-डिसेंबर : अजय देवगणच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'दे दे प्यार दे'. या सिनेमाचा सीक्वल (De De Pyaar De 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा १४ नोव्हेंबर २०२५ ला रिलीज होणार आहे. तर शर्वरी वाघ आणि आलिया भट यांचा 'अल्फा' (Alpha) हा सिनेमा २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे