सेलिब्रेटी कपल मालदीव्हजमध्ये मग्न, पण मिलिंद सोमण पत्नीसह पोहचला 10 हजार फुट उंच डोंगरावर By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 06:00 AM 2020-11-28T06:00:00+5:30 2020-11-28T06:00:00+5:30
मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसबाबत चर्चेत नेहमीच चर्चेत असतो . 55 वर्षे मिलिंद स्वत: ला फिट ठेवण्यात जराही कसर बाकी ठेवत नाही. वयाच्या ५५ व्या वर्षीही तो फिटनेसच्याबाबती तरूणांना मागे टाकतो. मिलिंदच नाही तर त्याची पत्नी अंकितादेखील फिटनेस फ्रिक आहे. नित्यनियमाने पती मिलिंदसह ती स्वतःलाही मेंटेन ठेवते.
नेहमीच हे कपल सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेसमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. तसेच दोघांचे रोमँटीक फोटोदेखील इतरांना कपल गोल देत असतात.
सध्या हे दोघे निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण एन्जॉय करत आहेत.
सध्या सेलिब्रेटी व्हॅकेशनसाठी मालदीव्हजमध्ये एन्जॉय करताना दिसतायेत. मात्र मिलिंद यासाठी अपवाद ठरला आहे.
पत्नीसह क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी त्याने मालदीव्हज नाही तर दार्जिंलिंगची निवड केली आहे.
दार्जिंलिंगच्या १० हजार फुट उंचारवर हे कपल ट्रेकिंगसाठी गेले होते.
त्याच दरम्यान दार्जिंलिंगमधील ट्रेडिशनल पोषाखात त्यांनी मस्त फोटोशूट केले आहे.
त्यातील काही निवडक फोटो त्यांनी चाहत्यांसह शेअर केले आहेत.
कलरफुल अशा अंदाजात हे कपल पाहायला मिळाले. या दोघांना पाहून ये हसीन वादियां, ये खुला आसमां आ गये हम कहाँ ऐ मेरे साजना या गाण्याच्या ओळीही नक्कीच आठवतील हे मात्र नक्की.
सध्या या कपलचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.