फवाद खानच नाही 'हे' पाकिस्तानी कलाकारही करणार बॉलिवूडमध्ये काम? दुसऱ्या नावाची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:10 IST2025-04-05T13:56:37+5:302025-04-05T14:10:12+5:30
फवाद खानचा वाणी कपूरसोबत 'अबीर गुलाल' सिनेमा रिलीज होत आहे. आणखी कोणत्या पाकिस्तानी कलाकारांची चर्चा? वाचा

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) पुन्हा भारतीय सिनेमात दिसणार आहे. त्याचा 'अबीर गुलाल' सिनेमा पुढील महिन्यात रिलीज होत आहे. या सिनेमात फवाद खान आणि वाणी कपूरची जोडी जमली आहे.
याआधी फवादने 'कपूर अँड सन्स' आणि 'खूबसूरत' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता तो बॉलिवूडमध्ये कमबॅकसाठी सज्ज आहे.
मधल्या काळात पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय सिनेमांमध्ये काम करण्यावरुन मोठा वादंग उसळला होता. मनसेने याला तीव्र विरोधा केला होता. आताही मनसे फवाद खानच्या बॉलिवूड कमबॅकला विरोध करत आहे. मात्र पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यावर कोर्टाकडून अधिकृतरित्या बंदी नाहीए.
फवाद खानच नाही तर आणखीही काही कलाकार भारतीय प्रोजेक्ट्समध्ये काम करणार असल्याची चर्चा आहे. २०२५ मध्ये ते पदार्पण करतील असं बोललं जात आहे. कोण आहेत ते?
पाकिस्तानी अभिनेत्री मावला होकेनने (Mawra Hocane) २०१६ साली 'सनम तेरी कसम' सिनेमात काम केलं होतं. आता ती भारतीय संगीतकार आणि गायक अखिल सचदेवाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तसंच सनम तेरी कसमच्या सीक्वेलमध्येही ती दिसेल अशी चर्चा आहे.
गायक बादशाहची खास मैत्रीण पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचेही भारताशी संबंध वाढले आहेत. गायक बादशाहसोबत तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. हानियाच्या पाकिस्तानमध्ये अनेक मालिका गाजल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, हानिया आमिर (Hania Aamir) लवकरच भारतात पदार्पण करु शकते. दिलजीत दोसांझसोबत तिच्या सिनेमाची चर्चा आहे. ती दिलजीतसोबत 'सरदार ३' मध्ये दिसेल असं बोललं जात आहे मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
पाकिस्तानी मालिका 'मेरे पास तुम हो' मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री ऐजा खानच्याही (Ayeza Khan) बॉलिवूड डेब्यूची चर्चा आहे. मध्यंतरी तिने फ्लाईटमधला फोटो शेअर केला होता यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा झेंडा होता. यावरुन तिच्या भारतीय प्रोजेक्टची चर्चा सुरु झाली.