PICS: 'प्यार का पंचनामा' हिट झाला पण लोक करु लागले होते नुसरत भरुचाचा व्देष, तिनेच केला होता हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 07:37 PM2022-02-15T19:37:06+5:302022-02-15T19:44:34+5:30

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha)आज हे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर ती इथपर्यंत पोहोचली. 2011 साली आलेल्या प्यार का पंचनामा सिनेमामुळे नुसरत भरूचा हे नाव घराघरात पोहोचले मात्र याच सिनेमामुळे तिला ट्रोलदेखील केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

ज्यामुळे ती नाराज झाली होती. कारण नुसरतने यात साकारलेल्या भूमिकेशी तिची तुलना करु लागले आणि तिचा व्देष करु लागले. (फोटो: इंस्टाग्राम)

एका मुलाखती दरम्यान ती खुलासा करत म्हणाली होती, 'प्यार का पंचनामा' मध्ये मी केलेली भूमिका आणि तिचा सिक्वेल पाहून लोकांनी माझा द्वेष करायला सुरुवात केली.(फोटो: इंस्टाग्राम)

कारण लोकांनी असे वाटचते होते की सिनेमात साकारलेल्या भूमिकेप्रमाणे मी खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे.  (फोटो: इंस्टाग्राम)

नुसरतला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने. ‘किटी पार्टी’ या टीव्ही सीरिअलमध्ये तिला संधी मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)