Olympics स्पेशल : धडाकेबाज खेळाडूंचा रुपेरी प्रवास, 'हे' चित्रपट पाहिले नसतील तर नक्की पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 07:00 AM2024-08-01T07:00:00+5:302024-08-01T07:00:00+5:30

'पॅरिस ऑलिम्पिक २०२४' (Olympics 2024 ) च्या स्पर्धा २६ जुलैपासून सुरू झाल्या आहेत.

सध्या जगभरात 'ऑलिम्पिक'मय (Olympics 2024 ) वातावरण झालं आहे. ऑलिम्पिक आणि चित्रपटांचे एकमेकांसोबत नाते आहे. आतापर्यंत ऑलिम्पिक खेळाडूंवर आधारित चित्रपट बनवण्यात आले आहेत. चला तर मग, यानिमित्ताने बघू यात कोणते आहेत ते चित्रपट.

मेरी कोम (२०१४) : बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम (Mary Kom) या जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी लंडन ऑलिम्पिक, २०१२ मध्ये महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत ५१ किलोचे कांस्य पदक जिंकले होते. दोन वर्षांनंतर २०१४ मध्ये 'मेरी कोम' हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. यात अभिेत्री प्रियंका चोप्राने मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमातील गाणीदेएखील लोकप्रिय आहेत.

सायना (२०२१) : बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित 'सायना' (Saina) चित्रपट २०२१ मध्ये रिलीज झाला. अमाेल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्राने महत्त्वाची भूमिका साकारली. ही कहाणी हरयाणातील एका छोट्याशा शहरातून आलेल्या अशा युवतीची आहे, जी स्वत:च्या मेहनतीने ऑलिम्पिकमध्ये अवॉर्ड स्वीकारणारी भारताची पहिली बॅडमिंटन खेळाडू बनली. तिने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक जिंकले आहे.

सूरमा (२०१८) : अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज अभिनीत 'सूरमा' (Soorma) हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट हॉकी खेळाडू संदीप सिंह यांच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्यांनी अर्धांगवायूसारख्या दुर्धर आजारावर मात देत आंतरराष्ट्रीय हॉकी टीममध्ये त्याचे स्थान निर्माण केले. २००९ मध्ये भारतीय टीमचे नेतृत्व करताना सुल्तान अजान शाह कप जिंकला आणि २०१२ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले.

मैदान (२०२४) : अजय देवगणचा चित्रपट 'मैदान' (Maidaan) या वर्षीच्या ईदच्या मुहूर्तावर १० एप्रिल रोजी रिलीज झाला होता. यात फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहीम याची कहाणी दाखवण्यात आली. आजारासोबत लढत देशाच्या आशियाई खेळात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. १९५६ मध्ये ऑलिम्पिक खेळात त्यांची टीम चौथ्या स्थानावर होती.

गोल्ड (२०१८) : बॉलिवूड खेळाडू अक्षयकुमारचा चित्रपट 'गोल्ड' (Gold) १५ ऑगस्ट २०१८ रोजी रिलीज झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. दिग्दर्शक रिमा कागती यांच्या चित्रपटाद्वारे हॉकी खेळाडू तपन दासची कहाणी जगासमोर आणली. त्यांनी लंडन १९४८ च्या समर ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमला सुवर्णपदक मिळवून दिले. अभिनेत्री मौनी रॉयचा हा पहिला चित्रपट होता.

भाग मिल्खा भाग (२०१३) : सुपरहिट चित्रपटांच्या यादीत 'भाग मिल्खा भाग' (Bhaag Milkha Bhaag) या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. महान धावपटू आणि फ्लाइंग शीख या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावरचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर हा मिल्खा सिंग यांच्या भुमिकेत दिसला होता. मिल्खा सिंग यांनी भारतासाठी राष्ट्रमंडळ खेळात सुवर्ण पदक जिंकले होते. एशियन खेळांमध्ये त्यांनी ४ वेळेस सुवर्ण पदक जिंकले होते. ऑलिम्पिक मेडल ते जिंकू शकले नाही. १९६०च्या ऑलिम्पिक खेळात ४०० मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत मिल्खा हे चौथ्या स्थानावर हाेते.

चंदू चॅम्पियन (२०२४) : इतिहासाच्या दस्तऐवजात हरवलेल्या एका जिद्दी खेळाडूचा भावस्पर्शी प्रवास दिग्दर्शक कबीरनं 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) सिनेमातून पडद्यावर मांडलाय. 'चंदू चॅम्पियन' हा पॅराऑलिम्पिकविजेते मुरलीकांत पेटकर यांचा जीवनपट आहे. सैन्य अधिकारी असलेल्या पेटकर यांना १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाक लढाईत अपंगत्व आले होते. त्यांनी या अपंगत्वावर मात करत पॅरालिम्पिकमध्ये तीन स्पर्धा प्रकारांमध्ये विजेतेपद मिळवले. त्यात जलतरण, भालाफेक, गोळाफेक यांचा समावेश आहे. त्यांचा हा सगळा प्रवास चित्रपटात आहे.

दंगल (२०१६) : दंगल (Dangal) हा २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात गीता फोगट व बबिता कुमारी यांची कहानी दाखवण्यात आली आहे. बबिता फोगटने 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक आणि दोन वर्षांनंतर जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. गीता फोगटच्या पावलावर पाऊल ठेवत बबिताने 2014 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये 2016 स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. गीता आणि बबिता यांची कुस्तीतील कामगिरी क्रीडाक्षेत्राला माहीत आहे. त्यामागे प्रचंड जिद्द, परिश्रम, चिकाटी आहे. हे सगळं दिग्दर्शक नीतेश तीवारी यांनी अत्यंत प्रभावीपणे 'दंगल' सिनेमात उभं केलंय. आमिर खान स्टारर चित्रपट 'दंगल' तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.

पान सिंह तोमर ( 2012) : तिग्मांशु धूलिया यांनी दिग्दर्शित केलेला हा चितरिपट भारतीय भारतीय एथलीट, पान सिंह तोमर (Paan Singh Tomar)यांच्या जिवनावर आधारीत आहे. यामध्ये एक खेळाडू आर्मीमध्ये भर्ती होऊन देखिल डाकू बनतो. या चित्रपटात पान सिहं यांची भुमिका इरफान खान याने निभावली आहे. तर माही गिल आणि विपिन शर्मा ही मुख्य भुमिकेत आहेत.

भारतीय खेळाडूंवरील या बायोपिकने आपल्या महान खेळाडूंच्या कथाच मोठ्या पडद्यावर आणल्या नाहीत. तर तरुण पिढीलाही प्रेरणा दिली आहे. कठोर परिश्रम, समर्पण आणि जिद्द असल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, हे आपल्या खेळाडुंनी दाखवून दिलं आहे.