बाबो..! फक्त १२वी पर्यंत शिकलेत बॉलिवूडचे हे कलाकार, या अभिनेत्रीनं तर सहावी इयत्तेत सोडली शाळा By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 03:53 PM 2022-07-12T15:53:45+5:30 2022-07-12T15:59:25+5:30
Bollywood Celebs Education : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, जे जेमतेम १२वी पास आहेत. नुकतेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने खुलासा केला की, कपूर कुटुंबात १०वी पास झालेला पहिला मुलगा आहे. जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल Kangana Ranaut: सिनेइंडस्ट्रीची पंगा गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणौतला लहानपणापासूनच मनोरंजन विश्वात येण्याची इच्छा होती. पण आई-वडिलांच्या सल्ल्याने तिने डॉक्टर होण्याच्या मार्गावर सुरुवात केली. पण तिचे मन सदैव त्याच्या स्वप्नाकडे लागले होते. अशा परिस्थितीत १२ वीत नापास होऊन घर सोडून दिल्लीला पळून गेलेली अभिनेत्री आज इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेत्री आहे.
Salman Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील भाईजान अभिनेता सलमान खान फक्त १२वी पास आहे. मुंबईतील वांद्रे येथील सेंट सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला, पण मॉडेलिंगमुळे त्याने आपले शिक्षण मध्येच सोडले.
Deepika Padukone : आपल्या अभिनयाने देश-विदेशात लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आज इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेत्री आहे. अभिनेत्रीच्या अभ्यासाबद्दल बोलायचे झाले तर दीपिका फक्त १२वी पास आहे. तिने पदवीसाठी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला, परंतु मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडले.
Karishma Kapoor : कपूर घराण्याची लाडकी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर लहानपणापासूनच अभ्यासापासून दूर पळत असे. तिचे लक्ष फक्त चित्रपटसृष्टीतच राहिले. यामुळेच सहावीत नापास झाल्यानंतर तिने शिक्षण सोडले. नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर केवळ पाचवी पास आहे.
बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर आज चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अभिनेता आहे. पण फार कमी लोकांना माहित असेल की हा अभिनेता त्याच्या अभ्यासात काही विशेष करू शकला नाही. कंगनाप्रमाणेच अर्जुन कपूरही १२वीच्या बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला होता, त्यानंतर त्याने पुढच्या शिक्षणाला रामराम केला.
बॉलिवूडच्या या कलाकारांनी कमी शिक्षण घेतले असले तरी आज ते सिनेइंडस्ट्रीतील यशस्वी कलाकार आहेत.