IN PICS : या ‘आऊटसाइडर्स’कडे बॉलिवूडने केले दुर्लक्ष, हिट सिनेमे देऊनही नाही मिळाले काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 04:28 PM2020-08-10T16:28:51+5:302020-08-10T16:36:06+5:30

बॉलिवूडमध्ये अनेक आऊटसाइडर आलेत, हिट सिनेमेही दिलेत मात्र याऊपरही बॉलिवूड इंडस्ट्रीने स्वीकारले नाही... यावर एक नजर

अनु अग्रवाल- आशिकी सारखा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर अनु अग्रवाल अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. अर्थात अपघातामुळे ती बॉलिवूडपासून दुरावली. मात्र आशिकी सारखा सिनेमा दिल्यानंतरही अनुला ते स्टेटस मिळाले नाही, जे तिला मिळायला हवे होते, हे एक कटू वास्तव आहे.

राहुल राय - आशिकी हा सिनेमा आणि राहुलला कोण विसरू शकेल. मात्र याऊपरही राहुल राय इंडस्ट्रीत फार काळ टिकला नाही.

ग्रेसी सिंग - लगान, मुन्नाभाई एमबीबीएससारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्यानंतरही अभिनेत्री ग्रेसी सिंगला इंडस्ट्रीने स्वीकारले नाही आणि ती बॉलिवूडमधून गायब झाली.

रोनित रॉय - 90च्या दशकात जान तेरे नाम सारखा सुपरहिट सिनेमा देणाºया रोनित रॉय याला सुद्धा आऊटसाइडर असल्याचा तोटा सहन करावा लागला. त्याच्या वाट्याला काही छोटे-मोठे रोल आलेत इतकेत. यामुळे तो टीव्हीकडे वळला.

मधु- अजय देवगणसोबत ‘फुल और कांटे’, रोजा असे सुपरहिट सिनेमे देणारी मधूचे करिअरही फार चालले नाही. अन्य अभिनेत्रींच्या तुलनेत मधूला ती ओळख मिळू शकली नाही.

भूमिका चावला - सलमान खानसोबत ‘तेरे नाम’ सारखा सुपरहिट सिनेमा देणारी अभिनेत्री भूमिका चावला हिलाही बॉलिवूडमध्ये म्हणाव्या तशा संधी मिळाल्या नाहीत. सुशांत सिंग राजपूतच्या ‘एमएस धोनी’मध्ये ती बहिणीच्या भूमिकेत दिसली तेवढीच.

प्राची देसाई - रॉक, बोल बच्चन सारखे हिट सिनेमे देणारी प्राची देसाई सुद्धा इंडस्ट्रीत फार काळ टिकली नाही.

महिमा चौधरी - परदेस सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा देणारी महिमा चौधरी बॉलिवूडमधून गायब झाली आहे. हळूहळू तिला लीड रोल मिळणे बंद झाले आणि ती बॉलिवूडमधून बाद झाली.

सोनल चौहान - इमरान हाश्मीसोबत जन्नत या सिनेमातून डेब्यू करणारी सोनल चौहान हिच्या वाट्यालाही फार काम आले नाही. याचमुळे ती साऊथ सिनेमांकडे वळली.

स्रेहा उल्लाल - सलमान खानच्या लकी या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री स्रेहा उल्लाल आता गायब झाली आहे. ऐश्वर्याची डुप्लिकेट म्हणून बॉलिवूडमध्ये आलेल्या स्रेहाला फार संधी मिळाल्या नाहीत. सोबत ती आजारीही पडली आणि बॉलिवूडला तिचा विसर पडला.

Read in English