काम मिळण्यासाठी अभिनेत्री करायची काळी जादू, स्वत: केला होता खुलासा, कोण होती ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:48 IST2025-04-09T16:40:30+5:302025-04-09T16:48:07+5:30

जादू किंवा तंत्र-मंत्र या प्रकराला बळी पडलेले अनेक कलाकार आहेत. त्या यादीत या अभिनेत्रीचाही समावेश होता.

असे अनेक स्टार आहेत जे काळी जादू किंवा तंत्र-मंत्र या प्रकराला बळी पडले.

या यादीत एका अभिनेत्रीचा समावेश होता. जिने बॉलीवूडमध्ये करिअर व्हावे म्हणून काही अघोरी उपाय केले होते.

विशेष म्हजे याची कबुली तिनं स्वत: दिली होती. ती अभिनेत्री आहे पायल रोहतगी.

पायल रोहतगी ही कंगना राणौतच्या 'लॉक अप' या शोमध्ये सहभागी झाली होती.

यावेळी शोमध्ये पायल रोहतगीनं एक धक्कादायक खुलासा केला होता.

'लॉक अप' शोमध्ये 'जजमेंट डे'च्या दिवशी कंगना हिनं सहभागी स्पर्धकांना या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील सत्य सांगण्यास सांगितलं होतं.

पायलनं तेव्हा खुलासा केला की, "माझं करिअर चांगलं व्हावं यासाठी काही वेगळया मार्गांचा अवलंब केला. त्यामध्ये वशीकरण आणि काळ्या जादुचाही समावेश होता".

पायलनं त्या गोष्टीचा फारसा फायदा झाला नसल्याचंही सांगितलं होतं. अभिनेत्रीच्या या खुलाशानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

पायल रोहतगीने २००२मध्ये 'ये क्या हो रहा है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर, ती २००६मध्ये '३६ चायना टाऊनटमध्येही दिसली.

मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते. तसेच ती 'बिग बॉस'मध्येही सहभागी झाली होती.