PHOTOS : actors Rakul Preet Singh Jackky Bhagnani tie the knot in Goa latest Wedding PHOTOS
PHOTOS : शुभमंगल सावधान...! रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:35 PM2024-02-21T22:35:19+5:302024-02-21T22:47:11+5:30Join usJoin usNext लग्नसोहळ्यातील सुंदर क्षण! बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्याला रकुल-जॅकीचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मीडिया रिपोर्टनुसार, रकुल आणि जॅकी यांनी लग्नात तरुण तहिलयानी, शांतनु आणि निखिल, फाल्गुनी शेन पीकॉक, कुणाल रावल आणि अर्पिता मेहता या पाच डिझायनरने तयार केलेले कपडे परिधान केले होते. गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात रकुल खूपच गोड दिसत होती. त्यावर तिने छान ज्वेलरी घातली. या लूकमध्ये रकुल सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे जॅकीने रकुलला मॅचिंग क्रिम कलरची शेरवानी परिधान केली. रकुलने लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिने कॅप्शनमध्ये लिहलं, 'तू कायमचा माझा आहेस'. यासोबतच तिने लग्नाची तारीख (21-02-2024) लिहली. तसेच #abdonobhagna-ni असा हॅशटॅगही तिनं दिला. लग्नानंतर पहिल्यांदाच रकुल-जॅकी एकत्र मीडियासमोर आले आणि फोटो क्लिक केले. यासोबत दोघांच्या कुटुंबीयांनी पापराझींना मिठाई वाटली. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे कपल आज लग्नबंधनात अडकले. चाहत्यांनी आणि सेलिब्रेटिंनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी दोघेही अगदी आनंदात दिसून आले. लग्नानंतर रकुल आणि जॅकी मुंबईत ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.टॅग्स :रकुल प्रीत सिंगसेलिब्रिटीबॉलिवूडजॅकी भगनानीलग्नसोशल मीडियागोवाRakul Preet SinghCelebritybollywoodjackky bhagnanimarriageSocial Mediagoa