photos deepika padukone ranveer singh mumbai wedding reception look from mumbai
दीपवीरच्या मुंबई रिसेप्शनचे हे फोटो एकदा तरी पाहाच...!! By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 12:37 PM2018-11-29T12:37:47+5:302018-11-29T12:44:00+5:30Join usJoin usNext काल २८ नोव्हेंबरला मुंबईत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या लग्नाचा दुसरा रिसेप्शन सोहळा रंगला. मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात झालेल्या या शाही सोहळ्यात सगळ्यांच्या नजरा खिळल्या त्या दीपिका व रणवीरवर. यावेळी दोघांनी पांढ-्या आणि गोल्डन रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. त्यांच्या रॉयल लूकचे हे फोटो पाहायला हवेच. बेंगळुरू येथे रिसेप्शन दिल्यानंतर काल दीपवीरने आपल्या कुटुंबीय व नातेवाईकांसाठी मुंबईत रिसेप्शन दिले. दीपवीरचा रॉयल अंदाज चर्चेचा विषय ठरला. विशेषत: दीपिकाने तर सगळ्यांनाचं घायाळ केलं. दीपिकाचा लूक हा एखादी अप्सरा अवतरली असाच होता. रणवीरने हे फोटो सोशल मीडियावरही शेअर केलेत. दीपवीर मीडियाला पोज देण्यासाठी बाहेर आलेत,तेव्हा मीडियाने दीपिकाला ‘वहिनी’ म्हणून संबोधले. मग काय, वहिनी हा शब्द ऐकून दीपिका व रणवीर दोघांनाही हसू आवरले नाही. दीपिका व रणवीरचे रॉयल लूक बॉलिवूडचे प्रसिद्ध डिझाईनर अबु जानी आणि संदीप खोसलाने डिझाईन केले होते. दीपिकाची हेवी साडीसोबत हेवी ज्वेलरी कॅरी केली होती. काही वेळ दीपिका यामुळे असहज दिसली. यावेळी रणवीरने तिला सांभाळले. गत १४ नोव्हेंबरला दोघांनीही कोंकणी पद्धतीने लग्न केले. यानंतर दुस-या दिवशी हे नवदांम्पत्य सिंधी पद्धतीने विवाहबद्ध झाले. स्टेजवर येताच रणवीरने दीपिकाचे दोन्ही हात हातात घेत, त्यांचे अलगद चुंबन घेतले. हा क्षण सगळ्यांसाठीच अविस्मरणीय होता. लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दीपवीर दोघांनीही सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या सुरक्षेवर सुमारे १ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आले होते.टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंगDeepveerDeepika PadukoneRanveer Singh