सुपर फिट !! बाळंतपणानंतर शूटींगवर परतली करिना कपूर; ग्लॅम लूक पाहून सगळेच झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 04:22 PM2021-03-22T16:22:19+5:302021-03-22T16:34:53+5:30

दुस-या मुलाच्या जन्मानंतर करिना शूटींगवर परतली आणि तिला पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

गेल्या महिन्यात 21 तारखेला करिना कपूर दुस-यांदा आई झाली. तिने दुस-या मुलाला जन्म दिला आणि आज बरोबर महिनाभरानंतर करिना कामावर पतरलीये. होय, ते सुद्धा सुपर फिट अवतारात.

दुस-या मुलाच्या जन्मानंतर करिना शूटींगवर परतली आणि तिला पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत करिना कपूर जबरदस्त फिट दिसतेय. तिचा फिटनेस हैराण करणारा आहे.

दुस-या प्रेग्नंसीकाळात करिनाचे वजन चांगलेच वाढले होते. पण महिनाभरात करिना ब-यापैकी स्लिम झालेली दिसतेय.

प्रसूतीनंतर लगेच महिनाभरात करिनाला इतके स्लिम आणि फिट बघून चाहतेही अवाक् झालेत.

पहिल्या मुलाच्या जन्मानंतरही करिनाचे वजन प्रचंड वाढले होते. मात्र दोनच महिन्यात ती पुन्हा आपल्या फिगरमध्ये परतली होती.

दोन्ही प्रेग्नंसीदरम्यान करिना अगदी शेवटपर्यंत काम करत होती. अगदी प्रसूतीच्या दोन दिवसआधीपर्यंत ती शूटींग करत होती.

आता चाहते करिनाला पुन्हा एकदा मोठ्या स्क्रिनवर पाहण्यास उत्सुक आहेत.

अद्याप करिनाने तिच्या दुस-या मुलाच्या नावाचा खुलासा केलेला नाही. त्याचा एक फोटो मात्र तिने शेअर केला होता. अर्थात त्यात त्याचा चेहरा दिसला नव्हता.